लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व अभिनेत्री कुशा कपिलाने घटस्फोटाची घोषणा केली आहे. ती व तिचा पती जोरावर सिंग अहलूवालिया विभक्त होत आहेत. लग्नानंतर सहा वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुशा व जोरावर दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

“आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, परंतु आम्हाला माहित आहे की आमच्या आयुष्यातील या टप्प्यावर हा योग्य निर्णय आहे. आम्ही एकमेकांबरोबर शेअर केलेलं प्रेम आणि आयुष्य आमच्यासाठी सर्व काही आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे सध्या आम्ही स्वतःसाठी जे शोधत ते एकमेकांमध्ये नाही. नातं टिकवण्यासाठी आम्हाला शक्य होत्या, त्या सर्व गोष्टी केल्या,” असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”

पुढे त्यांनी लिहिलं, “नात्याचा शेवट नेहमीच वेदनादायक असतो आणि आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबांसाठी ही एक कठीण परीक्षा आहे. पण, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे. आम्हाला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. ही जखम भरण्यास बराच वेळ लागेल. सध्या आमचे सर्व लक्ष एकमेकांना प्रेम, आदर आणि पाठिंबा देऊन यातून बाहेर पडण्यावर आहे. आम्ही चांगले पालक होऊन आम्ही आमच्या मुलीवर प्रेम करू तसेच एकमेकांचे चीअरलीडर्स आणि सपोर्ट सिस्टम बनण्याचा प्रयत्न करू.”

दरम्यान, कुशा व जोरावर यांची भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती. त्यानंतर दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं व सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. कुशा व जोरावर दोघेही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.