सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शीतली ही भूमिका साकारत शिवानीने सगळ्यांची मने जिंकली होती. या मालिकेत शिवानी सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

कुसुम ही आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी आहे. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

Mumbai Police registered murder case after body found in Mahim Khadi
माहीम खाडीतील मृतदेहाप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…

आणखी वाचा : समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट! पोस्ट शेअर करत समांथाने दिली माहिती

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते. हिंदीमध्ये कुसुम ही मालिका २००१ मध्ये प्रसारित झाली होती. या हिंदी मालिकेने त्यावेळीही प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि अनेक रेकॉर्ड ब्रेक केले होते. त्यावेळी कुसुम या मालिकेत त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता पुन्हा एकदा जेव्हा कुसुम येते तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचे प्रश्न सगळ्यासमोर मांडणार आहे. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.

आणखी वाचा : ‘मी घाबरलो होतो’; नागा चैतन्यने सांगितला समंथासोबतच्या पहिल्या ‘KISS’चा किस्सा

या मालिके विषयी एकता कपूर म्हणाली, “२१ वर्षानंतर ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर ‘कुसुम’ आणण्याची संधी मला मिळाली. ‘कुसुम’ ही मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली.” पाहायला विसरू नका ‘कुसुम’, ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader