आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा रक्षाबंधनला म्हणजेच ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा चांगलात चर्चेत आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वीच सोशल मीडियावरून आमिर खान आणि त्याचा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ वर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत आहेत. सिनेमाला होणारा विरोध पाहून आता आमिर खानची झोपच उडाली आहे. होय स्वत: आमिरने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत आमिर म्हणाला, की या सिनेमासाठी तो खुपच उदास आहे. गेल्या ४८ तासांपासून तो झोपलेला नाही. सिनेमाच्या रिलीजपूर्वी आमिर खानने ९ ऑगस्टला दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. “जर कुणाला हा सिनेमा पाहायचा नसेल तर त्याच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करू” असं वक्तव्य आमिर खानने यावेळा केलं. तर दुसरीकडे जास्तित जास्त लोकांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
हे देखील वाचा: आमिर खानच्या लाल सिंग चड्ढामध्ये शाहरुख खानची एण्ट्री, या भूमिकेत झळकणार
सिनेमाच्या रिलीजपूर्वी तो खूपच तणावात असल्याचा खुलासा त्याने केला. झोप लागत नसल्यामुळे पुस्तकं वाचून आणि ऑनलाईन चेस खेळून वेळ घालवत असल्याचं तो म्हणाला. एवढचं नव्हे तर दिग्दर्शक अद्वैत चंदन यांची स्थितीही अशीच असल्याचा खुलासा त्याने केला . त्यामुळे आता थेट ११ तारखेनंतरच झोप येवू शकते असंही आमिर म्हणाला.
हे देखील वाचा: “तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, बहिष्कार कशाला?” अक्षय कुमारचा सवाल
‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा पाहिल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया कशी असेल हे जाणून घेण्यासाठी आमिर स्वत: वेगवेगळ्या चित्रपटगृहांना भेट देणार आहे. शिवाय तो सिनेमागृहात आहे हे तो प्रेक्षकांना कळू देणार नाही. प्रेक्षकांच्या खऱ्या प्रतिक्रिया त्याला जाणून घ्यायच्या आहेत. असं तो पत्रकार परिषदेत म्हणाला आहे.
दरम्यान आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटाचे हक्क मिळविण्यासाठी ८-९ वर्षे लागली असा खुलासा आमिर खानने नुकताच एका मुलाखतीत केला होता. ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर खान व्यतिरिक्त करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.