आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची घोषणेपासून ते आमिर खानच्या चित्रपटातील लुकपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

‘लाल सिंह चड्ढा’च्या ट्रेलरमध्ये आमिर खानच्या व्यक्तिरेखेचं बालपण ते तारुण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवण्यात आलं आहे की, आमिर खाननं साकारलेली व्यक्तिरेखा लाल सिंह चड्ढाला बालपणी चालताना समस्या होत असते. तसेच तो मानसिकरित्याही इतरांच्या तुलनेत वेगळा आहे. या चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका अभिनेत्री मोना सिंह यांनी साकारली आहे. जी आपल्या मुलाला आयुष्यभरासाठी चांगली शिकवण देते. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. याशिवाय या ट्रेलरमध्ये करीना कपूर खान आमिरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकरताना दिसत आहे. जी त्याच्याशी लग्न करायला नकार देते.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”

आणखी वाचा- वाढलेलं वजन आणि वय लाजिरवाणं आहे का? ट्रोल करणाऱ्यांना अमृता अरोराचा सवाल

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आमिर खान वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये काही सीन भारतीय सैन्यासोबत आहेत ज्यात आमिरसोबत दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य देखील दिसत आहे. ट्रेलरच्या अखेरीस आमिरचा एक संवाद आहे जो मनाला स्पर्शून जातो, “जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है, पेट भर जाता है, मन नहीं” या चित्रपटातून आमिर खान एका सामान्य व्यक्तीची कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल बोलाताना आमिरनं मोठा खुलासा केला होता. ‘या चित्रपटासाठी मी माझी १२ वर्षं दिली आहेत.’ असं त्यानं सांगितलं होतं. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader