यंग-अ‍ॅडल्ट म्हणजेच तरुणतुर्की चित्रपटांमध्ये सरधोपटतेचे अस्तर नेहमी पाहायला मिळते. म्हणजे बंडखोरी या गुणधर्माशी जागत आदल्या पिढीशी यच्चयावत वैर करणारे नायक अथवा नायिका. वयानुरूप होणाऱ्या शारीरबदलाची ऊर्जा जागोजागी व्यक्त करीत राहण्याची ऊर्मी आणि प्रेमालापाचा जगविरोधी सूर परजत घडणाऱ्या कथानकांची चौकट घेऊन कितीतरी तरुणतुर्की चित्रपट दरवर्षी लक्षवेधी ठरले आहेत. गेल्या दीड-दोन दशकांमधील उदाहरणेच घ्यायची तर हायस्कूलमधील अष्टपैलू विद्यार्थ्यांचे पौगंडीअख्यान मांडणारा ‘रशमोर’, शाळकरी तरुणीची गर्भारगाथा व्यक्त करणारा ‘जुनो’, स्वरचित अफवेमुळे अत्याधुनिक शालेय जीवन सामाजिकदृष्टय़ा शंभर वर्षे मागे घेऊन जाणारा ‘इझी ए’, तरुणांच्या सांगीतिक चवीची घुसळण दाखविणारा ‘निक अ‍ॅण्ड नोराज इन्फिनिट लिस्ट’ या चौकटीबाह्य़ यंग अ‍ॅडल्ट सिनेमांनी तयार केलेली निराळी चौकट मोडून टाकणारा आणि पूर्णपणे धोपटवजा चित्रपट ‘लेडीबर्ड’च्या रूपात आला आहे. ग्रेटा गरविग या अभिनेत्री-लेखिका आणि दिग्दर्शिकेचे कॅमेरामागचे आसन सांभाळून तयार झालेला हा आत्मचरित्रात्मक आविष्कार तरुणतुर्की सिनेमाला अधिक समृद्ध आणि सजग वळणावर नेऊन ठेवणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पारंपरिक ‘यंग अ‍ॅडल्ट’ किंवा ‘कमिंग एज’ चित्रपटांप्रमाणे इथली प्रमुख व्यक्तिरेखा ख्रिस्टिन (सरोशा रोनन) जिने आपलेच नामकरण ‘लेडीबर्ड’ केले आहे, ती सुरुवातीलाच अतिबंडखोर रूपात हजर होते. हायस्कूलमधील वर्ष संपवून तिला आपले कॉलेज ठरवायचे आहे. सॅक्रेमेण्टो या अमेरिकेतील मुर्दाड आणि संधीशून्य शहरापासून जगात लोकप्रिय असलेल्या (न्यू यॉर्कजवळील) शहरांमधील कॉलेजमध्ये शिकायला जायचे आहे. चित्रपटाला सुरुवातच लेडीबर्डची आईशी कॉलेज निवडीवरून होणाऱ्या हुज्जतीने होते. आर्थिक आणि सामाजिक स्थितीची जाणीव करून देणाऱ्या आईच्या रडपाढय़ांना वैतागत लेडीबर्ड चालत्या गाडीतून उडी मारते. तिच्या या कृत्याने अचंबित होणाऱ्यांमध्ये तिची आई मॅरिअनच (लॉरी मेटकाफ) नसते, तर प्रेक्षकाला या व्यक्तिरेखाच्या तऱ्हेवाईक तगडेपणाची कल्पना येते. हा चित्रपट त्या तयार होणाऱ्या कल्पनांना धक्के देत पुढे सरकायला लागतो. म्हणजे संवादातून आणि पहिल्या काही दृश्यांमधूनच लक्षात येतो तो मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेल्या ‘लेडीबर्ड’च्या स्वप्नेरी दुनियेचा. तिला कॅथलिक शाळेमधील शिक्षणाविषयी काहीसा राग आहे. चित्रपटाचा काळ नुकताच अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील शहरगावांमध्ये न्यू यॉर्क शहराविषयी निर्माण होत असलेल्या आकसाचा आहे. चित्रपटाने ‘अलेनिस मोरिसेट’ आणि ‘डेव्ह मॅथ्यूज बॅण्ड्स’ या तेव्हाच्या हीटलिस्टवरील  गाण्यांचा धागा पकडत २००२ साल उभे केले आहे.

चित्रपटाला म्हटली तर कथा आहे, म्हटली तर नाही. पहिल्या प्रसंगानंतर ‘लेडीबर्ड’ आपल्या हाताच्या प्लास्टरसह कॅथलिक हायस्कूलमधल्या शेवटच्या वर्षांच्या वर्गात दिसते. तिथे तिच्याच वयाच्या आणि कॉलेजस्वप्नांनी भारावलेली मुले-मुली आहेत. लवकरच शाळेतील गाणी आणि नाटकाच्या ऑडिशनमध्ये ‘लेडीबडर्’ मैत्रिणीसह दाखल होते. तिथेच नवा मित्र तिला भेटतो आणि घरी परतताना तिने नुकत्याच घेतलेल्या पहिल्या चुंबनाचा आनंद उन्माद ती उस्फूर्तपणे व्यक्त करते. चित्रपट शाळेतील घटना आणि गमती-जमती यांना पाश्र्वभागी ठेवून चित्रपटाचा मुख्य घटक अत्यंत चाणाक्षपणे जुळवून आणतो. लेडीबर्ड आणि तिची आई मॅरियन यांच्यातील एकमेकांविषयीच्या प्रेम आणि रागावर आणि सॅक्रेमेण्टो या शहरावर या चित्रपटाची कथा बेतली आहे.

नोकरी नुकतीच गमावलेले वडील आणि वंशाने भिन्न असलेली (बहुधा दत्तक) भावंडे असणाऱ्या घरात नुकतीच यौवनावस्था प्राप्त झालेली ‘लेडीबर्ड’ आपल्या भवतालाकडे कशी पाहते, याचा हा चढता आलेख आहे. ती वर्गातल्या श्रीमंत मुलांशी बोलताना आपल्या घराविषयी खोटय़ा कहाण्या सांगते. तिच्या राहणीमानावर आणि वायफळ खर्चावरून आई तिची सातत्याने टोचणी देते, त्याकडे ती आपल्याच थाटात पाहते. अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या दिवशीच बंधन घातलेल्या साऱ्या मूलभूत गोष्टी करण्यासाठी सरसावते. प्रियकराबाबतच्या पारंपरिक कल्पनांना पूर्ण न होताना पाहिल्यावर त्याचा अपारंपरिकरीत्या मैत्रिणीसोबत शोक व्यक्त करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुपचूपरीत्या सॅक्रेमेण्टो शहराहून दूर असलेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करते. एकाच वेळी व्यक्तिरेखेत वयानुरूप बालिश आणि समंजस रंग भरणाऱ्या सरोशा रोनन हिने वठविलेली व्यक्तिरेखा दोन-तीन वर्षांपूर्वी आलेल्या तिच्या ब्रुकलीनमधील भूमिकेहून सरस वठली आहे. चित्रपटात आपल्या शहराविषयी असलेल्या रागासोबत दिसणारी नायिकेची भावस्पर्शी दृष्टीही वेळोवेळी पाहायला मिळते. सॅक्रेमेण्टो शहरातील उच्चभ्रूंच्या घराविषयी लेडीबर्डला असलेले आकर्षण, तिने हायस्कूलमध्ये दाखल केलेल्या शहराविषयीच्या निबंधाचे झालेले कौतुक आणि चित्रपटाच्या शेवटाला दिसणारा शहराचा वर्णनात्मक प्रवास यातून आजवर न अनुभवलेल्या अशा यूथपटाचे दर्शन घडू शकेल. या वयाला विशद करणाऱ्या अनेक कादंबऱ्या रिचविल्या किंवा चित्रपट पाहिले असले, तरी इथले धोपटवजापण बराच काळ विसरले जाऊ शकत नाही.