हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला असून, तो चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये लेडी गागा ‘तनू वेडस् मनू रिटर्न्स’ चित्रपटातील ‘घनी बावरी’ गाण्यावर थिरकताना दिसते. एका चाहत्याने हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला असून, सदर व्हिडिओचे उत्कृष्ट संकलन करण्यात आले आहे. व्हिडिओ पाहताना लेडी गागा नृत्याबरोबर गाणेदेखील गात असल्याचा भास होतो. लेडी गागाने गायलेल्या विविध गाण्यांच्या व्डिडिओचे मोठ्या खुबीने संकलन करून या व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे.

Story img Loader