छोट्या पडद्यावरील ‘लागिर झालं जी’ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितिश चव्हान हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सध्या नितिश त्याने केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. नितिशची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.
नितिशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. नितिशने त्याच्या एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नितिश एक फलक घेऊन उभा आहे. “आम्ही पळून जाऊन लग्न केलं आहे…आमच्या जीवाला धोका आहे”, असे त्या फलकावर लिहिले आहे. हा फोटो शेअर करत “मी आत्तापर्यंत सोशल मेडियावर माझ्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं नाही, कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, मला खरतरं हे असं सगळ्यांनसमोर सांगायचं नव्हतं पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत, म्हणून मला हे सांगावं लागतंय”, असे कॅप्शन नितिशने त्या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तिरेखा; श्रेयस तळपदेन केला खुलासा
आणखी वाचा : कुटुंबातील ‘या’ व्यक्तीमुळे शाहिद आणि करीनाचा झाला होता ब्रेकअप
नितीश चव्हाणची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तर नेटकरी नितीश आगामी प्रोजेक्टचं प्रमोशन करत असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्यानं अजून याबद्दल काही खुलासा केलेला नाही. ही पोस्ट नक्की काय आहे. हे पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत.