आमिर खानने चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून कमबॅक केलं. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल अशी अपेक्षा निर्मात्यांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांना होती. पण तसं काहीचं घडलं नाही. देशभरात या चित्रपटाची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटूनही हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठू शकला नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. एवढंच नाही तर आमिरचा हा चित्रपट परदेशातही कमाल दाखवू शकला नाही. १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
आणखी वाचा – अटकेनंतर काही तासांमध्येच केआरकेची प्रकृती बिघडली, अभिनेता रुग्णालयात दाखल
याचदरम्यान आमिरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या नुकसानाची जबाबदारी आमिरने स्वतः घेतली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून तो मानधन घेणार नाही. निर्मात्यांच्या नुकसान भरपाईसाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे वायकॉम १८ स्टुडिओजला जवळपास १०० कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. पण जर आमिरने मानधन घेत नाही तर हे नुकसान थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल. म्हणून आमिरने स्वतःचं पुढाकार घेत मानधन न घेण्याचं ठरवलं आहे. जवळपास गेली ४ वर्ष तो या चित्रपटासाठी मेहनत घेत होता. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला.
आणखी वाचा – ‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरला अन्…; हैद्राबादमधील चित्रपटगृहामध्ये पोहोचताच विजय देवरकोंडाचे डोळे पाणावले
बॉक्स ऑफिसवर नुकसान झाल्यानंतर ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांना ओटीटी डीलमध्येही नुकसान झालं. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससोबत सुमारे १५० कोटींचा करार केला आहे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरताच हा करारही तुटला. नवीन माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा यांचे डिजिटल अधिकार आता ५० कोटींना विकले गेले आहेत.