अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या बॉलिवूड करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. या सर्व चर्चांनंतर आता ललित मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे.
ललित मोदी हे इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. त्यासोबत त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुलीही दिली होती. “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असं ट्वीट मोदी यांनी केलं होतं.
“मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची पहिली प्रतिक्रिया
या ट्विटनंतर आता त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. ललित मोदी यांनी इन्स्टाग्राम बायोमध्ये ‘सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL चे संस्थापक’ असे लिहिले आहे. “अखेर मी माझ्या नव्या जोडीदारासोबत नवीन आयुष्य सुरु करत आहे. माझे प्रेम सुष्मिता सेन”, असेही त्यांनी त्यांच्या बायोमध्ये नमूद केले आहे. सध्या त्यांच्या या इन्स्टाग्राम बायोचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यावरुन त्यांना ट्रोलही केले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावरुन मिम्स बनवून व्हायरलही केले आहेत.
सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
दरम्यान ललित मोदी याचं आधीच एक लग्न झालेलं आहे. मात्र त्यांच्या पत्नीचे २०१८ साली कर्करोगाने निधन झालं. १९९१ साली ललित मोदी आणि मिनल हे लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. आलिया मोदी आणि रुचिर मोदी अशी त्या दोघांची नावे आहेत. रुचिर ललित मोदींसोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. तर ललित मोदी यांची मुलगी काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली.
तर दुसरीकडे ललित मोदी आणि सुष्मिता सेन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघे एकमेकांसाठीही पोस्ट शेअर करतात.