Lalit Modi on Marriage with Sushmita Sen : प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली. काही प्रसारमाध्यांनी दोघांच्या लग्नाची बातमीही प्रकाशित केली. यानंतर स्वतः ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही सध्या एकमेकांना ‘डेट’ करत आहोत, अशी कबुली दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ललित मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, “माझ्या लग्नाबाबतच्या वृत्तावर स्पष्टीकरण देण्यासाठी हे ट्वीट करत आहे. आम्ही लग्न केलेलं नाही. सध्या आम्ही केवळ एकमेकांना ‘डेट’ करत आहोत. लग्न देखील एक दिवस होईल.”

विशेष म्हणजे याआधी ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये ललित मोदी म्हणाले, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.”

हेही वाचा : BCCI, ललित मोदींना ‘ईडी’चा दणका; ठोठावला १२१ कोटींचा दंड

ललित मोदी यांच्या याच ट्वीटनंतर त्यांचं सुश्मिता सेनशी लग्न झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. यानंतरच ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत लग्नाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही केवळ एकमेकांना डेट करत आहोत, लग्न झालेलं नाही. एकदिवस लग्नही होईल, असं स्पष्टीकरण दिलं.