प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात राहिल असं २०२० चं वर्ष गेलं. या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. अनेकांना संकटाचा, दु:खाचा सामना करावा लागला. याच वर्षात इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून आजही चाहते सावरले नाहीत. ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप जरी घेतला असला, तरीदेखील त्यांनी मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषी कपूर यांचा ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ४ सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे याच दिवशी त्यांचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

वाचा : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयानंतर करिश्माने विकलं घर

‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरु आहे. तसंच ऋषी कपूर यांच्या भूमिकेचं चित्रीकरणदेखील अर्ध्यावर राहिलं होतं. मात्र, आता त्यांच्या जागी परेश रावल ही भूमिका साकारणार आहेत.

वाचा : सरु आजीमुळे फुटणार डॉ. अजितचं बिंग; ‘त्या’ घटनेचा होणार खुलासा?

दरम्यान, रितेश सिधवानी व फरहान अख्तर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर हितेश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातून एका ६० वर्षीय व्यक्तीची कथा सांगितली जाणार आहे.