सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी विल स्मिथला ‘किंग रिचर्ड’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर ‘कोटा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मेमोरियम’मध्ये त्या प्रसिद्ध सेलिब्रिटींची आठवण झाली, ज्यांनी गेल्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या सेलिब्रिटींमध्ये Sidney Poitier, Betty White, Ivan Reitman, Stephen Sondheim यांच्यासह अनेकांच्या नावांचा समावेश होता, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचे नाव नसल्याने भारतातील चाहते संतापले आहेत. आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा