भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी सगळ्यांची मने जिंकली होती. लता दीदींचे क्रिकेटवर असलेले प्रेम तर सगळ्यांनाच माहित आहे. मग ते १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करून त्यांच्यासाठी पैसे गोळा करणे किंवा मग माजी क्रिकेटपटू एमएस धोनीला निवृत्ती घेऊ नकोस दिलेला सल्ला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेट प्रेमी असलेल्या लता दीदींचं मन तर माजी क्रिकेटपटू एमएस धोनीने जिंकले होते. २०१९ मध्ये धोनी निवृत्ती घेणार अशा अफवा सुरु झाल्या होत्या. त्यावर लता दीदींनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत “नमस्कार एम एस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे”, असं लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं.

आणखी वाचा : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?

PHOTOS: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी माहितीये का?

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar death she was the big fan of ms dhoni and requested him to not consider taking retirement dcp