भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संगीतसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार ए आर रहमान यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत असलेला एक जूना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लता दीदींचा फोटो शेअर करत “लता मंगेशकर यांचा आवाज हा भारतीयांमध्ये नेहमीच राहील. आपल्या भारताच्या गौरवशाली कोकिळा. आपल्या भारतरत्न”, असे कॅप्शन तिने दिले आहे.

PHOTOS: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी माहितीये का?

रॅपर आणि गायक यो यो हनी सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून लता मंगेशकर यांचा फोटो शेअर करत, “भारताचा नेहमीच एकच कोकिळा असेल. तुमच्या आत्म्याला शांती मिळो”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीवरून फोटो शेअर करत “मी त्यांना कधी भेटली नाही. पण तरी मला अश्रू अनावर झाले आहेत”, असे कॅप्शन दिले.

आणखी वाचा : धोनीच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या लता मंगेशकर; निवृत्तीची बातमी ऐकताच केली होती विनंती

अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लता दीदींचा फोटो शेअर करत हार्टब्रेक झाल्याचं इमोटिकॉन कॅप्शन म्हणून देत. त्याचं दुख: व्यक्त केलं आहे.

Lata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला

अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करत “संगीत विश्वातील एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला! लताजी तुमची आठवण आम्हा लाखो लोकांना आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच असेल!”

अनिल कपूर लता दीदींचा फोटो ट्विटरवर शेअर करत म्हणाले, “मला फार वाईट वाटले, पण अशा मोठ्या आत्म्याला ओळखत असल्याचा आनंद आहे. लताजी नेहमीच आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहितील आणि त्यांची जागा इतर कोणी घेऊ शकणार नाही.”

अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी लता दीदींचा फोटो हातात घेतलेला एक फोटो शेअर करत हार्टब्रेक झाल्याचं इमोटिकॉन कॅप्शन म्हणून देत दुख: व्यक्त केलं आहे.

अभिनेता सलमान खानने इन्स्टाग्रामवर लता दीदींसोबतचा फोटो शेअर करत “तुम्ही आमच्या आठवणीत नेहमीच राहाला कोकीळा. पण तुमचा आवाज आमच्या सोबत कायम असेल”, असे कॅप्शन दिले आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यासोबत त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली.