गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. लता मंगेशकरांना करोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रचना शाह यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

मुंबईच्या महापौर करणार लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर या ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली.

लतादीदींच्या प्रकृतीसंबंधी उषा मंगेशकरांनी दिली माहिती; डिस्चार्ज मिळण्यास होऊ शकतो उशीर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “लता मंगेशकर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासणार नाही. सध्या रुग्णालयात कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही. जर गरज पडली तर मी स्वत: रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेईन. तसेच मी स्वत: डॉक्टरांकडे जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहे.

कोरोनासह न्यूमोनियाशीही झुंज

नवभारत टाईम्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समधानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर यांना गेल्या शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्या कोरोनासह न्यूमोनियाशीही झुंज देत आहेत.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना भजनसम्राट अनूप जलोटा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लताजींशी अनेकदा फोनवर बोलत असतो. मी अनेकदा त्यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे बोलतो. पण आजकाल त्या कोणालाच भेटत नाही. कारण वयोमानानुसार त्यांना लवकर संसर्ग होतो. गेल्यावेळी हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून त्या त्यांच्या खोलीतच असायच्या. त्या कोणत्याही बाहेरच्या लोकांना भेटलेल्या नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात राहतो. त्यांना आता झालेल्या करोनाबाबत घाबरण्यासारखे काहीही नाही. त्यांना सुरक्षेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होतील.