बॉलिवूडचा हॅण्डसम हंक या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. स्टालिश लूक आणि उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचलेल्या हृतिकला कलाविश्वात जवळपास २० वर्ष झाली आहेत. या २० वर्षांच्या कारकिर्दीत त्याचे असंख्य चाहते झाले असून त्याची क्रेझ केवळ सामान्यांमध्येच नाही तर कलावर्तुळातील अनेकांमध्ये पाहायला मिळते. यामध्येच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी अलिकडेच हृतिकचं कौतुक केलं असून सध्या त्यांचं ट्विट चर्चेत येत आहे.

लता मंगेशकर अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आवडलेल्या गुणांचं किंवा त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका तरुणीच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत तिला आशिर्वाद दिला होता. त्यानंतर आता त्यांनी हृतिकसाठी एक ट्विट करत त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे.


“नमस्कार हृतिक. तुमचं काम मला मनापासून आवडतं. तुमच्या कुटुंबाला मी कायम माझं कुटुंब असल्यासारखं मानलं आहे. मी प्रत्येक वर्षी रोशनजी यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्याविषयी लिहित असते. ते खरंच फार मोठे संगीतकार होते”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

वाचा : हृतिकच्या घरापुढं 5 star हॉटेलही फिकं; लिव्हिंग रुम पाहून विस्फारतील डोळे

 दरम्यान, लता मंगेशकर यांचं ट्विट पाहिल्यानंतर हृतिकनेदेखील त्यांना रिट्विट करत आभार मानले आहेत. या गोड शब्दांसाठी मनापासून धन्यवाद. माझ्यासाठी तुम्ही काढलेल्या या उद्गारांमुळे माझा मान नक्कीच वाढला आहे, असं हृतिक म्हणाला.

Story img Loader