Lata Mangeshkar Car Collection: स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. संगीताव्यतिरिक्त कार आणि क्रिकेटची आवड असलेल्या मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती? त्यांच्याकडे कोणत्या गाड्या होत्या हे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुटुंबासाठी मागे ठेवलीये ‘इतकी’ संपत्ती

लतादीदींचे जीवन अत्यंत साधे होते. जरी त्याच्याकडे गाड्यांचा मोठं कलेक्शन होतं. रिपोर्ट्सनुसार, लताजींची एकूण संपत्ती ३७० कोटी रुपये होती. लताजी दक्षिण मुंबईतील पॉश भागातील पेडर रोडवरील प्रभाकुंज भवनात राहत होत्या.

आहे कारचे कलेक्शन

लता दीदींच्या गॅरेजमध्ये आलिशान गाड्या उभ्या आहेत. लताजींनी फार पूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना गाड्यांची आवड आहे. लताजींनी या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी पहिल्यांदा शेवरलेट खरेदी केली होती. लता दीदींनी ही कार त्यांच्या मूळ गावी इंदूर येथून खरेदी केली होती. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ही कार त्याने आपल्या आईच्या नावावर घेतली होती. यानंतर त्याने बुइक (Buick ) कार खरेदी केली, त्याच्याकडे क्रिस्लर (Chrysler) कार देखील होती.

यश चोप्रांनी गिफ्ट केली मर्सिडीज

लतादीदींना यश चोप्रा यांनी भेट म्हणून मर्सिडीज कार दिली होती. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते, “दिवंगत यश चोप्रा जी मला त्यांची बहीण मानत होते. ‘वीरझारा’चे संगीत रिलीज झाले तेव्हा त्यांनी मर्सिडीजची चावी माझ्या हातावर ठेवली आणि सांगितले की ही कार भेट आहे. माझ्याकडे अजूनही ती कार आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar loved these cars this much wealth left behind for the family ttg