आज ‘International Mother’s Day’ म्हणजे ‘जागतिक मातृदिन’ त्या निमित्ताने मुलं त्यांच्या आईला शुभेच्छा देत असतात. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्या आईला सोशल मीडियाच्या माध्यामातून जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भारतरत्न आणि भारताच्या गानकोकीळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका लता मंगेशकर या त्यांच्या वडिलांची पूजा करायाच्या हे सगळ्यांना माहित आहे. मात्र, बऱ्याच लोकांना ठावूक नाही की लता दीदी या त्यांच्या आईशी देखील तितक्याच जोडलेल्या होत्या.
लता दीदींनी नुकतीच स्पॉटबॉलया मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आई विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. “आई, आम्ही सर्व भावंडांवर आमच्या आईचा अधिक प्रभाव होता. आम्ही आमच्या वडिलांना खूप लहान वयात गमावले. तेव्हा ते फक्त ४५ वर्षांचे होते. माझ्या त्यांच्या आठवणी या प्रामुख्याने संगीताशी संबंध आहेत. आईने आम्ही तीन भावंड मी बहिणी आणि भाऊ आम्हाला सांभाळले,” असे लता दीदी म्हणाल्या.
लताजी पुढे म्हणाल्या, त्यांनी त्यांच्या आईकडून या बिग बॅड वर्ल्डमध्ये कसे वागावे हे शिकले. “जर हे माझ्या आईसाठी नसते तर मी १६-१७ वर्षांची असताना बाहेर जायचे आणि स्वत:चे पोट कसे भरायचे हे समजले नसते. त्या वयात आणि ही १९४० ची गोष्ट आहे, मी चप्पल घालून आणि ७० रुपयांच्या साडीमध्ये काम शोधत एका रेकॉर्डिंग स्टुडिओपासून दुसऱ्या रेकॉर्डिंग स्टुडिओपर्यंत प्रवास करायची. ”
लता दीदी पुढे म्हणाल्या, “मी माझ्या आईकडून शिकलेली पहिली गोष्ट म्हणजे कधीही खोटे बोलू नये. आम्हाला सत्य बोलण्याचे सल्ले देण्याच कारण सांगत ती म्हणायची, “जेव्हा तुम्ही खोटं बोलताचत तेव्हा खोटं बोलल्याने तुमचे जीवन सुलभ होऊ शकते. पण त्यातुन तात्पुरता दिलासा मिळतो. तुम्ही पहिल्यांदा काय खोटं बोललात आणि त्यानंतर त्या गोष्टीला लपवण्यासाठी तुम्ही आणखी किती खोटं बोललात हे तुम्हाला शेवट पर्यंत लक्षात ठेवावं लागेल.”
पुढे लता दीदी म्हणाल्या, “मी माझ्या आईने सांगितल्या प्रमाणे प्रामाणिकपणाने आयुष्यभर जगले आहे, सत्य बोलल्याने कदाचित त्रास होईल दुख: होईल. परंतु यामुळे प्रत्येकाचे जीवन हे सुलभ होते. मला कोणती व्यक्ती आवडतं नसेल तर ती व्यक्ती मला आवडते हे भासवताना तुम्हाला मी कधीच सापडणार नाही”
तर आणखी एक गोष्ट लता दीदी त्यांच्या आईकडून शिकल्या त्याबद्दल त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “जी दुसरी गोष्ट मी आईकडून शिकलेली आहे. ती म्हणजे, भौतिक गोष्टींना नाही तर मानवी संबंधांना महत्त्व द्या. माझ्यासोबत असलेले सगळे लोकं असे आहेत ज्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. तुमच्या मित्रांना आणि प्रियजनांना कधीही कमी लेखू नका.”