जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन करतात, त्या स्वरसम्राज्ञी  लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने लतादीदींनी गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.
लतादीदी भावूक मनाने म्हणतात, “मला खरचं माहीत नाही ही ५१ वर्षे कशी उलटली परंतु, त्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. मी हे गाणे २७ जानेवारी १९६३ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितत गायले होते. त्यावेळी सर्वांचे पाणावलेले डोळे आजही मला आठवतात. हे मर्मभेदक गाणे प्रदीपजींनी लिहीले होते. तर, रामचंद्रजींनी संगितबद्ध केलेले. आपण देशासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांना जसे कधीच विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे या गाण्याच्या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही.”
१९६२ सालच्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजलीपर हे गाणे त्यावेळी दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थित गायले होते. आज ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थित लता मंगेशकरांनी या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा