गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मंगळवारी हजर राहू शकल्या नाही. लतादीदींनी मोदींना पत्र लिहून याबाबत दु:ख व्यक्त केल आहे. पुण्यात दीनानाथ हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी नरेंद्र मोदी हजर होते. यावेळी लतादीदींनी मोदी हे आपल्या भावासारखे आहे आणि ते पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
मंगळवारी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली पण यावेळी प्रकृती ठीक नसल्यामुळे लतातदीदी शपथविधी सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. लतादीदींनी मोदींना हजर न राहिल्याबाबत पत्राने दु:ख व्यक्त केले. तसेच मोदींना शुभेच्छा देत गणेशमूर्ती भेट म्हणून दिली.
लतादीदींचं पत्रात म्हटले आहे की, “आदरणीय, नरेंद्रभाई तुमचं निमंत्रण मिळालं पण प्रकृती अस्वास्थामुळे मी उपस्थित राहू शकत नाही. मला आशा आहे की, तुम्ही माझी अडचण समजून घ्याल. आपल्या मातृभूमीची धुरा देशाने आपल्या पवित्र हातात सोपविली आहे. आजचा दिवस संपूर्ण देशासाठी आनंदोत्सवाचा आहे. या मंगल समयी मी तुम्हाला गणेशमूर्ती भेट पाठवत आहे. तुमचे खूप अभिनंदन. वंदेमातरम् तुमची नम्र, लता मंगेशकर”

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी अभिनेता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनाही आमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र, हे दोघेही दिग्गज कलाकार काही कारणामुळे शपथिविधीला उपस्थित राहू शकले नाहीत.

Story img Loader