भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी सगळ्यांची मने जिंकली होती.

आज आपण अनेक जुन्या गाण्यांचे रिमिक्स व्हर्जन ऐकतो. पण तुम्हाला माहितीये लता दीदी या विरोधात होत्या. एवढंच काय तर २०१८ मध्ये त्यांनी स्वत: एक पत्र लिहत रिमिक्स गाण्यांना परवानगी देण्याआधी विचार करा असे रेकॉर्डिंग कंपन्यांना म्हणतं विनंती केली होती.

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

लता मंगेशकर यांनी जून २०१८ मध्ये ट्वीट करत त्यांना रिमिक्स गाण्यांविषयी तक्रार केली होती. यावेळी त्या म्हणाल्या की गीतकार जावेद अख्तर यांच्याशी त्या बोलत होत्या आणि त्यांना या विषयावर स्वत:चे मत मांडायचे होते. त्यांनी रेकॉर्डिंग कंपन्यांना क्लासिक गाण्यांच्या या रिमिक्स गाण्यांना आणि संगीतला परवानगी देण्याआधी विचार करा असे म्हटले होते.

Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

त्या पुढे म्हणाल्या, यात काही चुकीचं असं नाही आणि गाणं एका नव्या पद्धतीने सादर करणे गे योग्य असते जोपर्यंत आपण त्या गाण्याचा सार जपतो. पण एखाद्या गाण्याला वेगळ रुप देणं चुकीचं आहे. आजकाल असंच होतं असं मला ऐकायला येत आहे. एवढंच काय तर गाण्याच श्रेय देखील दुसऱ्या कोणाला दिले जात आहे. सुरांचा गाभा बिघडवायचा, पाहिजे तसे गाण्याचे बोल बदलायते आणि त्यात काही वाईट विचार जोडायचे, या सगळ्यामुळे मला प्रचंड त्रास होत आहे.

Lata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.