सुप्रसिद्ध पंजाबी दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या घरी आनंदाचे वातावरण पसरलं आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धूची आई चरण कौर यांनी वयाच्या ५८व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे सध्या पंजाबमधील मानसमध्ये आनंद साजरा केला जात आहे. “सिद्धू पुन्हा आला,” असं म्हटलं जात आहे. पण अशातच सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

१७ मार्च, रविवारी सिद्धू मुसेवालाच्या आईने आयव्हीएफच्या मदतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सिद्धूच्या वडिलांनी दुसऱ्या लेकाची पहिली झलक दाखवत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली. पण दोन दिवस उलटताच पंजाब सरकारकडून मुलाच्या उपचाराबाबतचा सविस्तर तपशील मागितला. यावरून बलकौर सिंह यांनी पंजाब सरकारवर लक्ष्य साधत विनंती केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे, “ही कोणती भीती किंवा मजबुरी आहे की सरकार एका नवजात बाळाच्या आनंदात ढवळाढवळ करत आहे.”

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा – सिद्धू मुसेवाला मागे सोडून गेलाय कोट्यवधींची संपत्ती

व्हिडीओत सिद्धूचे वडील म्हणाले, “सर्वांना सत श्री अकाल…आज मी तुमच्याशी एका खास कारणास्तव बातचित साधत आहे. तुम्हा सर्वांना माहित आहेच की, दोनच दिवसांपूर्वी ईश्वराच्या कृपेने आणि तुम्हाचा आशीर्वादाने आम्ही धन्य झालो. शुभदीप पुन्हा आमच्याकडे परतला आहे. पण मला सकाळपासून खूप अस्वस्थ वाटतं आहे. त्यामुळे मला वाटले की, तुम्हालाही संपूर्ण परिस्थितीबाबत सांगावं.”

“सरकार मला माझं मुलं कायदेशीर असल्याचे पुरावे देण्यास सांगत आहे. मला याबाबत विचारलं जात आहे. मी सरकार व विशेषतः मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो की, मुलावर पूर्ण उपचार करू द्या. मी इथेच पंजाबमध्ये राहतो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मी येईन. त्यामुळे पहिल्यांदाच मुलावर उपचार पूर्ण करण्यास प्राधान्य द्या.”

पुढे बलकौर सिंह म्हणाले, “२८ वर्षांच्या प्रवासात माझ्या मुलाने हे सुनिश्चित केलं आहे की, तो कायद्याचे पालन करतो. लष्करी पार्श्वभूमीतून येत असल्यामुळे मी देखील कायद्याचा आदर करतो. मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी कोणत्याही कायदेशीर चौकशीत पूर्ण सहभाग घेईन आणि सहकार्य करेन. मी कुठलाही कायदा मोडला असेल तर मला अटक करा. आणि तरीही तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर माझ्याविरोधात एफआयआर दाखल करा, मला अटक करा आणि तुमची चौकशी करा. मी वचन देतो की, तुम्हाला सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवेन आणि यातून निर्दोष होऊन बाहेर पडेन.”

हेही वाचा – सिद्धू मुसेवालाच्या आईने आयव्हीएफ नियमांचे पालन केलं नाही? आरोग्य मंत्रालयाने पंजाबला विचारला जाब

दरम्यान, २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती.

Story img Loader