प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत नाहीत यामागचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे पायरसी. आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ची पायरेटेड कॉपी काही दिवसातच इंटरनेटवर व्हायरल झाली होती. आपल्याकडच्या सायबर क्राइम डिपार्टमेंटला पायरसीला आळा घालण्यात बऱ्यापैकी यश आलं आहे. तरी पायरसी ही अशी गोष्ट आहे जी मुळासकट नष्ट करणं कठीण आहे. सध्या तर टेलिग्रामसारख्या ॅपच्या माध्यमातून पायरसी फारच सोप्पी झाली आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका साईटने पायरसी विश्वावर राज्य केलं होतं. त्या साईटचं नाव म्हणजे तामीळरॉकर्स.कॉम. या साईटने संपूर्ण चित्रपटसृष्टीला हादरवून सोडलं होतं, अगदी हॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांनीदेखील यांचा चांगलाच धसका घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या टॉरेंट साईटवर नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट सर्रास लिक व्हायचे आणि असंख्य लोकं ते डाउनलोड करून, शेअर करून त्या चित्रपटाचा आस्वाद घ्यायचे. याच साईटच्या प्रवासावर आणि त्यांना पकडणाऱ्या सायबर क्राइम डिपार्टमेंटच्या कामावर प्रकाश टाकणारी ‘द तामिळरॉकर्स’ ही वेबसीरिज नुकतीच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.

या वेबसीरिजमध्ये तामीळरॉकर्स या साईटच्या मागे काम करणाऱ्या टोळीबद्दल विस्तृतपणे चित्रण करण्यात आलं आहे. ही टोळी नेमकी कशी काम करायची? प्रत्येक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या बरोबर एक दिवसआधी चित्रपट लिक करण्यात त्यांना यश कसं मिळायचं? याबद्दल या वेबसीरिजमध्ये माहिती दिली आहे. इतकंच नव्हे तर या टोळीचे संबंध बाहेरच्या देशातल्या टोळ्यांशी असल्याने इंग्रजी चित्रपटांचीसुद्धा ते अगदी सहज पायरसी करायचे.

सध्या या वेबसीरिजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. याचा पहिला सीझन प्रदर्शित झाला असून त्यात ८ एपिसोड आहेत. या वेबसीरिजमध्ये अर्जुन विजय, वाणी भोजन, इस्‍वर्य मेनन हे कलाकार मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात.

आणखीन वाचा : रहस्य आणि क्राईमने भरलेल्या या वेब सीरिज तुम्ही OTT वर मोफत पाहू शकता, कोणताही खर्च न करता