लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमी चाहता वर्ग मोठा आहे. अनके समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दीही झालेली पाहायला मिळते. तिच्या लावणी कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच गौतमीने ‘द ऑड इंजिनियर’ या सोशल मीडिया चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वेगवेगळ्या प्रश्नांची तिच्या हटके स्टाईलमध्ये उत्तरं दिली तसेच आपल्यावर टीका करणाऱ्या लोकांनाही तिने खडेबोल सुनावले. याबरोबरच सध्या सगळीकडेच ‘आयपीएल’ची हवा आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे याच मुलाखतीमध्ये गौतमीने तिचा आवडता क्रिकेटपटू आणि आवडता ‘आयपीएल’ संघ याबाबतही खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “तो भोकं पडलेला टी-शर्ट, जुनी ट्रॅक पॅन्ट…” सैफ अली खानची स्टाईल अन् साधेपणाबद्दल करीना कपूरचा खुलासा

या मुलाखतीमध्ये गौतमीला रॅपिड फायरमध्ये आयपीएल संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिच्याकडे दोनच पर्याय होते. आवडता खेळाडू विराट कोहली की महेंद्रसिंह धोनी? यावार गौतमीने धोनी असं उत्तर दिलं. तर आवडता ‘आयपीएल’ संघ या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी तिचे चाहते आतुर होते. आवडता संघ कोणता ‘मुंबई इंडियन्स’ की ‘चेन्नई सुपर किंग्स’? या प्रश्नावर गौतमीने ‘मुंबई इंडियन्स’ हे उत्तर देत तिच्या चाहत्यांना खुश केलं.

आणखी वाचा : अयान मुखर्जीने दिलं आणखी एक सरप्राइज; हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सांभाळणार धुरा

मध्यंतरी कपडे बदलतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आली होती. हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. इतके दिवस गौतमीने याबाबत मौन बाळगलं होतं, पण या मुलाखतीमध्ये तिने यावरही भाष्य केलं आहे तसेच असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.