dilip thakurबरोबर बारा वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २००४ रोजी सकाळीच साडेपाच वाजता विजय कदमचा फोन आला, आपला लक्ष्या गेला….. आजच लक्ष्मीकांत बेर्डेचा स्मृतिदिन. या काळात मराठी चित्रपट व त्याचा प्रेक्षक यांचा खूपच मोठा प्रवास झाला तरी लक्ष्याचा ठसा कायम आहे हे जास्तच महत्वाचे. गिरगावातील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा होतानाच लक्ष्याला अभिनयाची सुरसुरी. युनियन हायस्कूलमधे शालेय तर चौपाटीच्या भवन्स कॉलेजमधे उच्च शिक्षण घेणारा लक्षा कॉलेजमधे एकांकिकात भाग घेण्यात रमायचा. साहित्य संघ मंदिरात तो बॅक स्टेजवर धडपडायचा. खूप मेहनत व संघर्ष करीत करीत प्रवास केलेल्या लक्ष्याचा नाटकातील महत्त्वाचे वळण म्हणजे पुरुषोत्तम बेर्डेचे ‘टूरटूर’ नाटक, तर चित्रपटात मोठा ब्रेक महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’ (१९८५) मधे मिळाला. दोन्ही माध्यमातून त्याने आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली. मराठी कलाकारांचे मानधन वाढविण्याचा मान त्याच्याकडे जातो. एकाद्या सोहळ्यास वा उदघाटनला जाण्याची उत्तम बिदागी मिळावी हे त्याने रुजवले ( त्याची फळे आज मिळताहेत) लक्ष्या मराठीतील सुपर स्टार झाला. नाटक व चित्रपटाला त्याच्या नावाने बुकिंग होई हे विशेषच कौतुकाचे. नाटकात प्रेक्षकांपर्यंत थेट पोहचता येते म्हणून त्याने ‘कार्टी उडाली भुर्र…’ स्वीकारले. कधी स्टेडियमवर जाऊन तर कधी सेटवर दूरचित्रवाणीवर क्रिकेट पाहण्याचा त्याचा शौक भन्नाट होता. त्यातून त्याला उर्जा मिळे.

‘मैने प्यार किया’पासून तो हिंदीत गेला. ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ इत्यादींत त्याने काम केले. मराठीत ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’, ‘पटली रे पटली’ असे करत करत तो डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ (१९९२)पर्यंत पोहचला. त्याच्या कारकीर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा. जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशी तगडी कलाकार मंडळी. लक्ष्मीकांतने या भूमिकेवर भरपूर मेहनत घेतली. तसा तो हळवा. या अभियानासाठी राज्य सरकारकडून सर्वोत्तम अभिनयाचा पुरस्कार नक्कीच मिळेल असा त्याला प्रचंड विश्वास. नामांकन मिळाल्याने तर त्याचा तोच विश्वास आणखीन वाढला. पण… हा पुरस्कार हुकल्याने तो कमालीचा निराश झाल्याचे आजही स्पष्ट आठवतेय. धोबीतलावच्या रंगभवन येथील त्या सोहळ्यास जवळपास सगळी मराठी चित्रपटसृष्टी हजर होती. आपण डावलेले गेल्याची भावना तत्क्षणीच त्याच्या भेटीत जाणवली. विनोदी कलाकाराला कोठेच गंभीरपणे घेत नाहीत या त्याच्या दु:खात ही भर होती… प्रिया अरुणसोबत संसार थाटल्यावर अभिनय व स्वानंदी या दोन मुलाना जन्म दिला. अभिनय आता “ती सध्या काय करतेय ” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झालाय तर स्वानंदी अकरावीत शिकतेय…
दिलीप ठाकूर

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Story img Loader