बरोबर बारा वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २००४ रोजी सकाळीच साडेपाच वाजता विजय कदमचा फोन आला, आपला लक्ष्या गेला….. आजच लक्ष्मीकांत बेर्डेचा स्मृतिदिन. या काळात मराठी चित्रपट व त्याचा प्रेक्षक यांचा खूपच मोठा प्रवास झाला तरी लक्ष्याचा ठसा कायम आहे हे जास्तच महत्वाचे. गिरगावातील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा होतानाच लक्ष्याला अभिनयाची सुरसुरी. युनियन हायस्कूलमधे शालेय तर चौपाटीच्या भवन्स कॉलेजमधे उच्च शिक्षण घेणारा लक्षा कॉलेजमधे एकांकिकात भाग घेण्यात रमायचा. साहित्य संघ मंदिरात तो बॅक स्टेजवर धडपडायचा. खूप मेहनत व संघर्ष करीत करीत प्रवास केलेल्या लक्ष्याचा नाटकातील महत्त्वाचे वळण म्हणजे पुरुषोत्तम बेर्डेचे ‘टूरटूर’ नाटक, तर चित्रपटात मोठा ब्रेक महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’ (१९८५) मधे मिळाला. दोन्ही माध्यमातून त्याने आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली. मराठी कलाकारांचे मानधन वाढविण्याचा मान त्याच्याकडे जातो. एकाद्या सोहळ्यास वा उदघाटनला जाण्याची उत्तम बिदागी मिळावी हे त्याने रुजवले ( त्याची फळे आज मिळताहेत) लक्ष्या मराठीतील सुपर स्टार झाला. नाटक व चित्रपटाला त्याच्या नावाने बुकिंग होई हे विशेषच कौतुकाचे. नाटकात प्रेक्षकांपर्यंत थेट पोहचता येते म्हणून त्याने ‘कार्टी उडाली भुर्र…’ स्वीकारले. कधी स्टेडियमवर जाऊन तर कधी सेटवर दूरचित्रवाणीवर क्रिकेट पाहण्याचा त्याचा शौक भन्नाट होता. त्यातून त्याला उर्जा मिळे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मैने प्यार किया’पासून तो हिंदीत गेला. ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ इत्यादींत त्याने काम केले. मराठीत ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, ‘रंगत संगत’, ‘पटली रे पटली’ असे करत करत तो डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ (१९९२)पर्यंत पोहचला. त्याच्या कारकीर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा. जोडीला वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, निळू फुले, मधु कांबिकर, उषा नाईक, पूजा पवार, विजय चव्हाण अशी तगडी कलाकार मंडळी. लक्ष्मीकांतने या भूमिकेवर भरपूर मेहनत घेतली. तसा तो हळवा. या अभियानासाठी राज्य सरकारकडून सर्वोत्तम अभिनयाचा पुरस्कार नक्कीच मिळेल असा त्याला प्रचंड विश्वास. नामांकन मिळाल्याने तर त्याचा तोच विश्वास आणखीन वाढला. पण… हा पुरस्कार हुकल्याने तो कमालीचा निराश झाल्याचे आजही स्पष्ट आठवतेय. धोबीतलावच्या रंगभवन येथील त्या सोहळ्यास जवळपास सगळी मराठी चित्रपटसृष्टी हजर होती. आपण डावलेले गेल्याची भावना तत्क्षणीच त्याच्या भेटीत जाणवली. विनोदी कलाकाराला कोठेच गंभीरपणे घेत नाहीत या त्याच्या दु:खात ही भर होती… प्रिया अरुणसोबत संसार थाटल्यावर अभिनय व स्वानंदी या दोन मुलाना जन्म दिला. अभिनय आता “ती सध्या काय करतेय ” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झालाय तर स्वानंदी अकरावीत शिकतेय…
दिलीप ठाकूर