बॉलिवूडचे माजी प्रेमीयुगल रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण सध्या कोरसिकामध्ये इम्तियाझ अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. चित्रपटाचे शुटिंग सुरू असतानाच चित्रपटाशी निगडीत व्हिडिओ आणि छायाचित्रे इंटरनेटच्या माध्यामातून सार्वजनिक झाली आहेत. अलिकडेच चित्रपटाशीसंबंधील एक व्हिडिओ ऑनलाइन झळकला असून, या व्हिडिओमध्ये चित्रपटातील प्रमुख अभिनेता एका गाण्यासाठी नृत्याचा सराव करताना पाहावयास मिळतो. व्हिडिओमध्ये रणबीर कपूर ‘नागिन’ गाण्यावर नृत्य करताना दिसतो, थोड्यावेळाने दीपिकासुद्धा त्याच्याबरोबर नृत्याचा सराव करताना दृष्टिस पडते. दीपिकाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली दीपिका आणि टी-शर्टवर जॅकेट परिधान केलेला रणबीर व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. याआघी अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात एकत्र दिसलेल्या या जोडीचा मोठ्या पडद्यावरील करिष्मा पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी त्यांचे चाहाते नक्कीच अधीर झाले असणार. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहा!…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा