प्रेम आणि मैत्री ही बॉलीवूड चित्रपटांचे सर्वात जवळचे विषय आहेत. चित्रपटातील भूमिकांमध्ये कुठेतरी स्वतःला काहीवेळा पाहायला लागतो. मग याच बॉलीवूड चित्रपटांकडून तुम्ही काय शिकू शकाल ते जाणून घ्या.
१.प्राधान्य-
जाने तू या जाने ना…. हा चित्रपट तर सर्वांच्याच लक्षात असेल ना. जेव्हा जयच्या (इरफान खान) लक्षात येते की अदितीचा (जेनेलिया) वाढदिवस आहे आणि यादिवशी अदितीलाही आपण तिच्यासोबत असले पाहिजे असे वाटत असेल. हे माहित असतानाही जय त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाहेर जाण्याचे का ठरवतो? आपल्या सर्वात जवळचा मित्र/मैत्रिणीचा वाढदिवस ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही त्यांना वाढदिवसादिवशी निदान शुभेच्छा तरी द्याव्यात अशी त्यांची अपेक्षा असतो. त्यामुळे मित्रांना प्राधान्य देणे फार महत्त्वाचे आहे.
२. ये दोस्ताना किसी प्लॅन से ज्यादा रॉकिंग है… –
दोस्ताना… आपण काहीतरी योजना करतो पण कधीकधी ते पूर्ण होत नाही, जसं सॅम आणि नेहाच्या बाबतीत घडलं. पण विचार करा जर आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही घडू लागल तर आपल्या आयुष्यातील लोकांना आपण तितकचं महत्तव दिल असतं का? मैत्री अधिक मजबूत असणे जितके गरजेचे आहे त्याहीपेक्षा तुमच्या आयुष्यातील लोकांची आणि मित्रांची कदर करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांसोबत केलेल्या योजना फसल्या तरी वाईट न मानता पुढे आणखीन काहीतरी चांगलं घडेल असा विचार करा.
३. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं… अगदी मित्रांनासुद्धा-
जय त्याच्या प्रेयसीसोबत चित्रपट बघायला जाणार असतो. अदितीला ते कळल्यावर ती संपूर्ण गँगसोबत त्याच चित्रपटगृहात जाते. जय सर्व मित्रमैत्रीणींसोबत न बसता प्रेयसीसोबत चित्रपट बघण्यासाठी वेगळ्या ठिकाणी बसतो. तुम्ही मित्र आहात म्हणून प्रत्येकवेळेस एकमेकांसोबत राहिलचं पाहिजे अस नाही. मित्रांना त्यांच्याप्रमाणे जगू द्यावं. याचाच अर्थ तुम्ही एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करता. त्यांनाही स्वतःच असं वेगळ जग आहे याचा तुम्ही विचार करून त्यांच्या मनाप्रमाणे ते जगायला देणे गरजेचे आहे.
४. माफी मागणे-
दिल चाहता है…. सिद्धार्थच्या प्रेमाबाबत बोलताना आकाश मर्यादा ओलांडतो. पण जेव्हा त्याला आपली चुकी कळते तेव्हा तो माफी मागून स्वतःची चूक सुधारतो आणि सिद्धार्थसुद्धा त्याला माफ करतो. मैत्री ही अशीच आहे. मनात काहीही न ठेवता चुकी झाल्यावर एकाने माफी मागावी तर दुस-याने तितक्याच मोठ्या मनाने माफ करायचे असते. कधीही मनात राग किंवा द्वेष ठेवू नये.
५. चांगले मित्र कधीही आणि कुठेही मिळू शकतात-
आयुष्य अगदीच काही वाईट नाही हे जेव्हा राणीला समजवण्याची गरज असते त्यावेळेस तिच्या आयुष्यात विजयालक्ष्मी येते. ती राणीला जीवनाचा आनंद लुटायला शिकवते. तसेच, राणीने स्वतःची ओळख बदलण्याचा प्रयत्न करू नये असेही ती समजावते. यामुळे तुम्हाला असे कळते की तुम्हला कधीही आणि कुठेही चांगले मित्र मिळू शकतात.
बॉलीवूडकडून शिका मैत्रीच्या या पाच गोष्टी
प्रेम आणि मैत्री ही बॉलीवूड चित्रपटांचे सर्वात जवळचे विषय आहेत. चित्रपटातील भूमिकांमध्ये कुठेतरी स्वतःला काहीवेळा पाहायला लागतो. मग याच बॉलीवूड चित्रपटांकडून तुम्ही काय शिकू शकाल ते जाणून घ्या.
First published on: 03-08-2014 at 03:44 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Learn 5 friendships lessons from bollywood