निर्मात्या- दिग्दर्शक लीना मणीमेकलाई त्यांच्या ‘काली’ माहितीपटाच्या पोस्टर वादामुळे चर्चेत आहेत. अद्याप त्यांच्या माहितीपटावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. लीना मणीमेकलाई यांच्यावर टीका केली जात आहे आणि त्यांच्या विरोधात कारवाई देखील केली जात आहे. पण या सगळ्यात लीना मणीमेकलाई यांनी पुन्हा एकदा नवीन वादग्रस्त ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे ट्वीट देखील कालीमातेशी संबंधित आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी कालीमातेला क्वीर (Queer) म्हटलं आहे.

लीना मणीमेकलाई या सातत्याने ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट करताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कालीमातेबाबत वादग्रस्त ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये लीना यांनी लिहिलं, “माझी काली क्वीर (Queer) आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताकतेवर थुंकते. ती हिंदुत्व उद्ध्वस्त करते. ती भांडवलशाहीचा नाश करते आणि तिच्या हजार हातांनी ती सर्वांना आलिंगन देते.”

लीना यांच्या ‘काली’ माहितीपटाच्या ज्या पोस्टवरवरून वाद सुरू झाला आहे. त्या पोस्टरवर कालीमातेच्या अवतारात एक महिला सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. याशिवाय तिच्या हातात LGBTQ समुदयाला समर्थन देणारा सप्तरंगी झेंडा आहे. लीना यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये कालीमातेला Q म्हणजे Queer म्हटलं आहे.

आणखी वाचा- “जय मां कलकत्ते वाली तेरा श्राप…” Kaali पोस्टर वादानंतर अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत

दरम्यान लीना मणीमेकलाई यांनी २ जुलैला ट्विटरवर त्यांच्या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. हे पोस्टर कॅनडाच्या आगा खान म्यूझियममधील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलं होतं. या पोस्टरवर कॅनडामधील हाय कमिशननं नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला. यानंतर लीना यांच्या माहितीपटाचं पोस्टर ट्विटरनं ब्लॉक केलं होतं.