बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ‘ट्रजेडी किंग’ अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार याचं निधन झालंय. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या एक महिन्यापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज ७ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांचे निधन झाले. आज दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील जुहू येथील दफनभूमीत अंत्यविधी पार पडले.
दिलीप कुमार यांच्या दफनविधीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. दिलीप कुमार यांना शासकिय इतमामात निरोप दिला जाणार आहे. दिलीप कुमार यांचं पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळण्यात आलं होतं. त्यांच पार्थिव अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्याआधी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासह शाहरुख खान, रणबीर कपूर, अनुपम खेरसह अनेक कलाकारंनी दिलीप कुमार यांचं अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांच्या दफनविधीचा व्हिडीओ हा सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या युट्यूब अकाऊंटवरून शेअर केला आहे.
दिलीप कुमार यांच निधन झाल्यानंतर दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कुटुंबीयानी जुहू येथील दफनभूमीत सायंकाळी पाच वाजता अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.