रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका या तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली. नुकतंच विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.

tharala tar mag fame jui gadkari reveals her age in ask me session
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला नेटकऱ्याने विचारलं ‘वय किती?’ अभिनेत्रीने थेट सांगितला आकडा…
no alt text set
अभिषेक बच्चन बॉलीवूडमधून घेणार होता कायमची निवृत्ती; बिग…
Nikki Tamboli
अरबाज पटेलला डेट करणारी निक्की तांबोळी लग्न केव्हा करणार? लाजत म्हणाली, “तुम्हाला…”
sana khan Instagram account
बालकावरील उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटींची फसवणूक, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरून नागरिकांना मदतीचे आवाहन
shubh vivah fame actress kunjika kalwint father in law death
‘शुभविवाह’ फेम अभिनेत्रीच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन; भावुक होत म्हणाली, “लग्न झालं की नाती बदलतात, पण…”
Priya Bapat
Video : प्रिया बापटने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायलं गाणं; पती उमेशनेही केलं कौतुक; म्हणाली, “आठवणीत ठेवावी…”
Paaru
Video: ‘या’ व्यक्तीमुळे अहिल्यादेवी-आदित्यमध्ये येणार दुरावा; आई-मुलाच्या नात्यात होणार गैरसमज, पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो
Arijit-Singh
फक्त दीड तासांचा परफॉर्मन्स अन् मुंबईत मिळालं आलिशान घर, अरिजित सिंहच्या मानधनाबाबत प्रसिद्ध रॅपरचा खुलासा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. कित्येक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांनीदेखील त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची हळहळ व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर नाना यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नाना यांनी लिहिले आहे, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….”

nana patekar post
नाना पाटेकर पोस्ट

नाना यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ या चित्रपटात गणपतराव बेलवलकर ही अजरामर भूमिका साकारली होती. नाटकावर बेतलेल्या या चित्रपटात नाना यांच्याबरोबर विक्रम गोखले यांची एक खास भूमिकाही आपल्याला पाहायला मिळाली होती. जणू ही भूमिका खास चित्रपटासाठी आणि या २ नटांच्या दर्जेदार अभिनयासाठीच लिहिली गेली होती. या चित्रपटात विक्रम गोखले यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.