Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Live Updates

Lata Mangeshkar Passes Away : लता मंगेशकर यांच्या जाण्याने कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात असून अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांसोबतच राजकीय नेतेही पोहोचत आहेत. शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

14:44 (IST) 6 Feb 2022
माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान : साधना सरगम

गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांचे निधन ही दुखद बातमी आहे. मात्र ही बातमी संगीतक्षेत्रातील आम्हाला कुणालाही ऐकायचीच नव्हती. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान आहे. संगीतक्षेत्राचीही हानी आहे. त्यांचे या क्षेत्राला खूप मोठे योगदान आहे. त्या देशाची शान होत्या. भारतरत्न होत्या. गाणे कसे असावे, सूर कसे असावे हे शिकण्यासारखे होते. त्यांनी खूप पिढ्यांसोबत काम केले आणि त्यांच्याकडून बरेच गायक, संगीतकार खूप काही शिकले. आम्ही फार कमी भेटलो, पण जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचे आशीर्वाद लाभले, अशा शब्दात पार्श्वगायिका साधना सरगम यांनी श्रद्धांजली वाहिली

14:40 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईला निघणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मुंबईसाठी रवाना होणार

14:26 (IST) 6 Feb 2022
अभिनेते अमिताभ बच्चन प्रभूकुंज निवासस्थानी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले

14:21 (IST) 6 Feb 2022
राज ठाकरे त्यांच्या पत्नी आणि आई यांच्यासह प्रभूकुंज निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी दाखल

13:56 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या जाण्यामुळे भारताचे वैभव हरपले : अण्णा हजारे

लतादीदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायलेली भक्तीगीते, भावगीते आणि देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादीदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.लतादीदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता.

पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली, असे अण्णा हजारे म्हणाले.

13:53 (IST) 6 Feb 2022
भारतीय संघाकडून काळी फित बांधून लतादीदींना श्रद्धांजली

13:50 (IST) 6 Feb 2022
त्यांच्याशी होणारा हा संवाद आता शक्य नाही : गायक शंकर महादेवन

माझ्या संगीत क्षेत्रातील कामाची सुरुवातच मुळात लतादिदींबरोबर, त्यांच्या आशीर्वादाने झाली. खळेकाकांचे एक गीत होते, 'राम भजन कर मन' ते लतादिदींनी गायले आणि त्यात मी वीणा वाजविली होती. त्यामुळे सुरुवातच संगीत क्षेत्रातील 'देवा'बरोबर झाली आणि आज मी जो काही आहे तो त्यांच्या आर्शिवादामुळेच. माझ्यासाठी त्या देवासारख्या आहेत. माझ्या वाढदिवसाला त्यांनी मला सोन्याची गणपतीची मूर्ती दिली होती. ती मूर्ती माझ्या देव्हाऱ्यात असून मी रोज त्या मूर्तीची पूजा करतो. त्यामुळे या मूर्तीच्या रूपाने माझ्या डोक्यावर त्यांचा हात कायम असणार आहे. दिदींशी माझे नियमित फोनवर बोलणे व्हायचे. अलीकडे आम्ही व्हाट्सअपवरून जास्त संवाद साधायचो. त्यांना मोबाइल तंत्रज्ञानाची बरीच माहिती होती. अनेक व्हिडिओ त्या मला एडिट करून पाठवायच्या. माझी काही गाणी पाठवली की भरभरून कौतुक करायच्या; मस्त इमोजी पाठवायच्या. त्यांच्याशी होणारा हा संवाद आता शक्य नाही. पण त्यांच्या गाण्यातून, आठवणीतून हा संवाद अविरत सुरू राहील. त्या आपल्यातून गेल्या असल्या तरी प्रत्येकाच्या मनात आहेत आणि राहतील, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.

13:42 (IST) 6 Feb 2022
पोलीस पथकाकडून पार्थिवाला मानवंदना देण्यात येणार

सचिन तेंडुलकर, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर, अनिल देसाई, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह दिग्गज व्यक्ती प्रभूकुंज येथे दाखल, पोलीस पथकाकडून पार्थिवाला मानवंदना देण्यात येणार

13:16 (IST) 6 Feb 2022
शिवाजी पार्क परिसरात तात्पुरते पोलीस नियंत्रण कक्ष, १० हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात

शिवाजी पार्क बंदोबस्त व व्यवस्था

-बंदोबस्ताला १० हजार पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करणार

– उद्यान गणेश मंदिराशेजारी स्टेजचे बांधकाम सुरु, तेथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

– त्याच्या बाजूला १० मीटर अंतरावर अंत्यविधी होणार

– समोर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्टेज

– शिवाजी पार्क मैदानाशेजारी नो पार्किंग झोन करणार, रस्त्यावर गाड्या उभ्या करण्यास बंदी

– परिसरातील मार्गांवर वाहतूकीचे निर्बंध लावणार, एक हजार वाहतूक कर्मचारी शिवाजीपार्क, दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात तैनात राहणार

– सावरकर स्मारकात प्रमुख अतिथी थांबवण्याची व्यवस्था करणार, आदित्य ठाकरेंनी महापालिका, पोलीस अधिकाऱ्यासह स्मारकाची पाहणी केली

– प्रमुख राजकीय नेत्यांना उद्यान गणेश मंदिरा शेजारच्या प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार

– पोलिसांकडून शिवाजी पार्क परिसरात तात्पुरते नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार

13:12 (IST) 6 Feb 2022
सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमात बदल, शिवाजी पार्कमध्येच अंत्यसंस्कार होणार

पंतप्रधानांसह अनेक व्हिआयपी मंडळी उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमात बदल,

शिवाजी पार्कमध्येच अंत्यसंस्कार होणार,

सर्वसामान्यांनाही अंत्यदर्शन घेता येणार,

शिवाजी पार्कच्या जिमखाना गेट येथून सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार,

तर उद्यान गणेश येथून व्हीआयपींना प्रवेश

13:09 (IST) 6 Feb 2022
लतादीदींचे पार्थिव ‘प्रभूकुंज’ निवासस्थानी दाखल

लतादीदींचे पार्थिव 'प्रभूकुंज' निवासस्थानी दाखल, अनेक दिग्गज अंत्यदर्शनासाठी दाखल

12:58 (IST) 6 Feb 2022
सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज प्रभुकुंजवर दाखल

आशुतोष गोवारीकर , जावेद आख्तर, अनुपम खेर यांसह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज प्रभुकुंजवर दाखल,

12:55 (IST) 6 Feb 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

12:54 (IST) 6 Feb 2022
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

12:54 (IST) 6 Feb 2022
प्रभूकुंजबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

लतादीदींचं निवासस्थान प्रभूकुंजबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे

12:52 (IST) 6 Feb 2022
लतादीदींचे पार्थिव प्रभूकुंज या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार

लतादीदी यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. साधारण दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

12:44 (IST) 6 Feb 2022
देशभरातील लोकांच्या मनात वेदना – सरसंघचालक मोहन भागवत

“लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केवळ मीच नाही तर संपूर्ण देशभरातील लोकांच्या मनात जी वेदना होत आहे, तिचे शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. भगवंत त्यांच्या कुटुंबास हे दु:ख सहन करण्याचे धैर्य प्रदान करो. मी माझ्याकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Lata Mangeshkar Passes Away : …आता तो आनंदघन बरसणार नाही – सरसंघचालक

12:24 (IST) 6 Feb 2022
संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले : सुप्रिया सुळे

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

12:05 (IST) 6 Feb 2022
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल,

आदित्य ठाकरेंकडून अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा

सुरक्षा व्यवस्थेसह व्हिआयपी एंट्री या सर्व स्थितीचा आढावा

12:04 (IST) 6 Feb 2022
स्वरसम्राज्ञी एकच होती आणि एकच राहणार, ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण यांची प्रतिक्रिया

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगशेकर यांचे निधन ही सर्वात दुखद घटना आहे. या संगीतक्षेत्रातील मोठी हानी असून एक पोकळीच निर्माण झाली आहे. स्वरसम्राज्ञी एकच होती आणि एकच राहणार. मी माझ्या मूळ गावी असताना लहानपणी त्यांचे गाणे ऐकत असे आणि पुढे जाऊन त्यांचासोबत गाणे गाण्याची संधीही मिळेल हे मला वाटलेच नव्हते. हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईला आलो तेव्हा संघर्षाच्या काळात त्यांच्याशी भेट झाली. त्यांची एक आठवण कायम राहिल अशी आहे. त्यांच्यासोबत अनेक स्टेज शो केले. १९९२ मध्ये माझ्या वाढदिवशी बेंगलुरुमध्ये त्यांच्यासोबत गाण्याचा शो होता. समोर लाखो श्रोते होते. तेव्हा लता मंगेशकर यांनी मला भेट म्हणून सोन्याची चैन दिली आणि सर्व श्रोत्यांसमोर प्रिन्स ऑफ सिंगिंग अशी एक उपाधीही दिली. त्यांचे त्यावेळी आशीर्वादही मिळाले व ते कायम राहिले. मी त्यांच्यासोबत २०० गाणी गायली आहेत. डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दुश्मन यासह अनेक चांगल्या चित्रपटात त्यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली, अशा शब्दात ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली.

11:56 (IST) 6 Feb 2022
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांची भावूक प्रतिक्रिया

भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत ऐकतच आमची, आमच्या आधीची व नंतरच्या पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांचे संगीत हे जीवनाचा अविभाज्य घटक होते. माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी व त्यांचा ४० च्या दशकापासून परिचय होता. तेव्हा दोघांचाही संघर्षाचा काळ होता. लता मंगेशकर यांनी त्यानंतर त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्या आमच्या घरी येत. त्यांच्या पुणे, मुंबई इथल्या घरी जाण्याचे भाग्य मला लाभले.

१९९१- ९२ च्या सुमारास मी काही मराठी अभंगांचे संगीत दिग्दर्शन केले होते, हे अभंग माझे वडील पं. भीमसेन जोशी यांनीच गायले होते. त्या वेळी लता मंगेशकर यांची भेट झाली होती. त्यांनी सकल संत गाथेची प्रत स्वत: साक्षरी करून मला भेट दिली होती.

स्वरांची अचूकता, गोडवा, शब्दांचे उच्चारण आणि भावसंगीताचे गायन कसे असावे, याच्या त्या कुलगुरू होत्या. त्यांच्या संगीतामुळे अनेक पिढ्यांचे कान घडले. माझ्या व कुटुंबियांच्या वतीने गानकोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

11:54 (IST) 6 Feb 2022
लतादीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील : पंकजा मुंडे

प्रत्येक स्वर ऐकणार्‍या, गाणार्‍या,गुणगुणणा-यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज,सोज्वळ भाव, जरीकाठी साड़ी,अंगभर पदर,लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही”आदरांजली” लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!!, अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली

11:51 (IST) 6 Feb 2022
संपूर्ण चित्रपटसृष्टीचा सूर आज हरवला, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त भावूक

'मधुचंद्र' हा माझा सिनेमा खूप गाजला आणि मी त्या यशाच्या मस्तीत होतो. पण त्यानंतर सात महिने मला कामच नव्हते. मी मद्रासला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो सुलोचनाबाईना सांगितला. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी भालजी पेंढारकर यांच्याकडे शब्द टाकला. मी भालजीना भेटायला गेलो. त्यांनी मला असिस्टंट म्हणून कामास ठेवण्यास नकार दिला.

पण त्यानंतर मला एक सिनेमा त्यांनी दिला आणि त्याच सिनेमाला पुढे राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याबरोबर मी कोल्हापूर गाठले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते म्हणाले, अरे माझे नाही लतादिदींचे आशीर्वाद घे. कारण त्यांच्यामुळे तुला हा सिनेमा मी दिला. तेव्हा माझ्या लक्षात आले की , मी काम मागण्यास गेलो तेव्हा लतादीदी तिथे होत्या. मी कोल्हापूरवरून मुंबईला थेट त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. मी योग्य आणि चांगल्या मुलाला मी काम द्यायला सांगितले याचा मला आनंद असल्याचे म्हणत त्यांनी माझे कौतुक केले. पुढे हा जिव्हाळा वाढत गेला. आज त्यांच्या निधनाची बातमी आली असून इतकेच सांगेन की असा निरागसपणा, सात्विकता पुन्हा कधी दिसणार नाही.संपूर्ण चित्रपटसृष्टीचा सूर आज हरवला आहे, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी श्रद्धांजली वाहिली

11:49 (IST) 6 Feb 2022
कला जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

“गानकोकिळा, 'भारतरत्न' लता मंगेशकर यांचे निधन हे अत्यंत दु:खद आणि कला जगताचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. प्रभू श्री रामाच्या चरणी अशी प्रार्थना आहे की, दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल कुटुंबीयांना व त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी.” अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

11:38 (IST) 6 Feb 2022
शब्द राहिले सूर हरपला, गीते राहिली स्वर हरपला… – चंद्रकांत पाटील

“भारताचा सुमधुर सूर हरपला ! लता दीदी आपल्याला सोडून गेल्या या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या हजारो गाण्यांचा सुरेल प्रवास आणि आवाज अजरामर राहणार आहे. संगीत क्षेत्रातील या प्रतिभासंपन्न महागायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली !” अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

11:37 (IST) 6 Feb 2022
शिवाजी पार्कात अंत्यसंस्काराची तयारी सुरु

11:35 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहे. दुपारी साडे चार वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील. शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

11:32 (IST) 6 Feb 2022

त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती होणे नाही. संगीत विद्येचे प्रतीकच! खऱ्या अर्थाने भारतरत्न!! अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

11:28 (IST) 6 Feb 2022
संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला : खासदार उदयनराजे भोसले

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रद्धांजली वाहिली

11:26 (IST) 6 Feb 2022
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले – नाना पटोले

आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, लता दीदींच्या आवाजात जादू होती, असा आवाज शतकात एखाद्यालाच लाभतो. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले होते. आपल्या ७८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लतादीदींनी हिंदी, मराठीसह २० भाषांमधील २५ हजारांहून अधिक गितांना आवाज दिला. आनंदघन नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारासह जगभरातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. लतादीदी ह्या फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या भूषण होत्या. त्यांच्या निधनाने संगीत आणि सांस्कृतीक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या चिरकाल स्मरणात राहतील.

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.