Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Live Updates

Lata Mangeshkar Passes Away : लता मंगेशकर यांच्या जाण्याने कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात असून अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांसोबतच राजकीय नेतेही पोहोचत आहेत. शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

11:22 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे

लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

11:19 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार

लता मंगेशकर यांचे पार्थिव दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पेडर रोडजवळील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील

11:10 (IST) 6 Feb 2022
“..तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

11:07 (IST) 6 Feb 2022
थम गया सुरों का कारवां, लतादीदींच्या निधनाने संगीतातले एक पर्व संपले : छगन भुजबळ

लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

11:00 (IST) 6 Feb 2022
केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला – देवेंद्र फडणवीस

लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली

10:58 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

10:56 (IST) 6 Feb 2022
अशी गानकोकीळा पुन्हा होणे नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी आद्वितीय होत्या, अशी गानकोकीळा पुन्हा होणे नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली

10:53 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

लता मंगेशकर यांचे पार्थिव शिवाजी पार्क मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

10:51 (IST) 6 Feb 2022
स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

10:49 (IST) 6 Feb 2022
लतादीदींना देण्यात आलेला शेवटचा पुरस्कार

करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 2018 मध्ये लता मंगेशकर यांना स्वर माऊली हा पुरस्कार देण्यात आला होता.

10:48 (IST) 6 Feb 2022
केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला – फडणवीस

“लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. ” अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाजंली अर्पण केली आहे.

10:48 (IST) 6 Feb 2022
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर

लता मंगेशकर यांच्या निधानानंतर आता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

10:46 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली लतादीदींना श्रद्धांजली

‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कुणीही भरुन काढू शकत नाही. येणारी पिढी ही त्यांना भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’ असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

10:43 (IST) 6 Feb 2022
लतादीदींचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान : नितीन गडकरी

देशाची शान आणि संगीत जगतातील गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे, असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

10:34 (IST) 6 Feb 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली

शिवसेना नेते संजय राऊत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अनेक ट्विट केले आहेत. संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना 'युग संपले' असे लिहिले आहे.

10:27 (IST) 6 Feb 2022
लतादीदी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली माहिती

लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बऱ्याही झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सर्व अवयव निकामी होत गेले. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.