काही दिवसांपूर्वी अत्यावस्थ प्रकृती असलेले विख्यात ज्येष्ठ गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, ९४ वर्षीय मन्ना डे यांना दोन दिवसांपूर्वीच कृत्रिम श्वसन यंत्रणेवरुन हलविण्यात आले आहे. श्वसन प्रक्रियेत समस्या येत असल्यामुळे त्यांच्यावर मागील एक महिन्यापासून उपचार सुरु होते. तसेच, मूत्रपिंडाचाही त्रास असल्यामुळे त्यांना डायलिसीसला सामोरे जावे लागत आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात पारंगत असलेले मन्ना डे यांनी हिंदी, बंगाली आणि विविध भाषांमध्ये ३५००च्या वर गाणी गायली आहेत. मुंबईत ५० वर्षे राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ते बंगळुरुमध्ये स्थायिक झाले.

Story img Loader