स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘लेक माझी लाडकी’ मालिकेमध्ये लवकरच बारशाचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलंय. बाळाचं नाव काय ठेवायचं याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. मात्र याच कार्यक्रमात इरावतीसमोर एक सत्य उघड होणार आहे. ज्या बाळाचं इतकं कौतुक होतंय ते बाळ सानिकाचं नसल्याचं धक्कादायक वास्तव इरावतीसमोर येणार आहे. हे बाळ नेमकं कुणाचं आहे? सानिकापासून हे सत्य का लपवण्यात आलं? मीराचा या सर्वाशी काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर महाएपिसोडच्या भागात उलगडणार आहेत.

अत्यंत भावनिक असा हा महाएपिसोड असणार आहे. प्रत्येक आईसाठी तिचं बाळ हे तिचा प्राण असतो. ज्या बाळासाठी सानिकाने असंख्य स्वप्न रंगवली होती ते बाळ आपलं नाही हे सत्य सानिकासमोर येईल का? ती या सत्याचा स्वीकार कसा करेल? हे महाएपिसोडच्या भागात स्पष्ट होईल. २९ जुलै रोजी दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता हा विशेष भाग प्रसारित होईल.

Stree trailer: मर्द को दर्द होगा म्हणत प्रेक्षकांना घाबरवणार श्रद्धा

Story img Loader