हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो भारतीय वंशाच्या मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. ४८ वर्षांच्या अभिनेत्याचे २८ वर्षीय नीलम गिलबरोबर नाव जोडले जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दोघांचेही फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर पुन्हा एकदा लिओनार्डो व नीलम यांचे पॅरिसमधून फोटो व्हायरल झाले आहेत.

“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”

लिओनार्डो डिकॅप्रिओ सध्या भारतीय वंशाची मॉडेल नीलम गिलमुळे चर्चेत आहे. परदेशी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लिओनार्डो ३१ मे रोजी लंडनमधील चिल्टर्न फायरहाऊसमध्ये नीलम गिल आणि त्याची आई इर्मेलिन इंडेनबिर्कन तसेच मित्रांसह नाईट-आउटचा आनंद घेत होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा २३ जून रोजी तो नीलमसोबत दिसला. इथे ते टॉबे मॅग्वायरबरोबर डिनरसाठी आले होते. यावेळी टॉबेची मुलंही त्यांच्याबरोबर होती. यावेळी लिओनार्डो डिकॅप्रियोने काळ्या रंगाची टी आणि जीन्स घातली होती. तर नीलम गिलने ब्लॅक टँक टॉप आणि बेज मिनी स्कर्ट व स्टिलेटो बूट घातले होते.

नीलम गिल ही भारतीय वंशाची मॉडेल आहे. तिचे आजी-आजोबा पंजाबचे होते. ती वयाच्या १४ व्या वर्षापासून मॉडेलिंग करत आहे. तिने या वर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती, तिथे लिओनार्डो देखील त्याच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित होता. इन्स्टाग्रामवर नीलमचे अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.