हॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेत्री लिओनार्डो डिकॅप्रिओ आज इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांने आतापर्यंत साकारलेल्या सर्वच भूमिका कम्माल आहेत. त्याने आतापर्यंत बरेच हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनय कौशल्याबरोबरच लिओनार्डो त्याच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत असतो. लिओनार्डो नेहमीच स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणींना डेट करतो असं बोललं जातं. आता पुन्हा एकदा तो एका मॉडेलबरोबर स्पॉट झाला आहे. त्याच्या डिनर डेटचे फोटो समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच लिओनार्डो आणि मॉडेल व्हिक्टोरिया लमास डिनर डेटसाठी जात असताना एकत्र स्पॉट झाले होते. असं बोललं जात आहे की, व्हिक्टोरिया आणि लिओनार्डो यांच्या वयात २५ वर्षांचं अंतर आहे. लिओनार्डो ४८ वर्षांचा आहे तर व्हिक्टोरिया २३ वर्षांची आहे. लिओनार्डो आणि व्हिक्टोरिया यांना ‘द बर्डस्ट्रीट क्लबहाऊस’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. दोघंही वेगवेगळे रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. मात्र नंतर एकाच कारमध्ये बसून दोघंही निघून गेले. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
व्हिक्टोरिया लमास ही अभिनेते लोरेंजो लमास यांची मुलगी आहे. ती एक मॉडेल आणि अभिनेत्रीही आहे. व्हिक्टोरियाने ‘द लास्ट थिंग दॅट अर्थ सेड’, ‘टू नाइनर’, ‘अ व्हर्चुअल रोल’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लिओनार्डो आणि व्हिक्टोरिया यांच्या नात्याबद्दल बोलताना सूत्रांनी मात्र दोघांच्या अफेअर किंवा डेटिंगच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
आणखी वाचा- Ukraine War : युक्रेनच्या मदतीला धावून आला लिओनार्डो डि कॅप्रियो; युद्धग्रस्त देशाशी आहे खास नातं
दरम्यान ऑगस्ट २०२२ मध्ये लिओनार्डो आणि त्याची गर्लफ्रेंड कमिला मोरोन यांचा ब्रेकअप झाला होता. २५ वर्षिय कमिलाबरोबर नातं तोडल्यानंतर लिओनार्डो बराच ट्रोल झाला होता. सोशल मीडिया युजर्सनी, लिओनार्डो २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अभिनेत्री किंवा मॉडेल्सना डेट करत नाही असा दावाही केला होता आणि यावरून त्याच्यावर टीकाही केली होती. ब्रेकअपनंतर तो सुपरमॉडेल जीजी हदीदबरोबरही दिसला होता. त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.