‘द ग्रेट गॅट्सबाय’ चित्रपटातील नायक लिओनार्डो डिकॅप्रिओने चित्रपटातील सह-कलाकार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लिओनार्डोने चित्रपटातील प्रमुख पात्र जय गॅट्सबायची, तर अमिताभ बच्चन यांनी गॅट्सबायचा मित्र मेअर वुल्फशिमची भूमिका साकारली होती. आपल्या एका संदेशात लिओनार्डो म्हणाला की,  बच्चन यांचे ज्ञान आणि अभिनयाच्या क्षमतेनेच आपण प्रभावित झालो नसून, त्यांच्यातील माणुसकीने आपण भारावून गेलो आहोत. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायची संधी मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. भूमिका साकारताना छोट्याछोट्या गोष्टींमधील त्यांची ऊर्जा अनुभवणे, हा माझ्यासाठी मोलाचा अनुभव होता. भविष्यात मला त्यांच्याबरोबर पुन्हा काम करायला निश्चितच आवडेल. अमिताभ आणि लिओनार्डो एकमेकांचे प्रशंसक आहेत. चित्रीकरणाच्यावेळी आणि चित्रपट प्रसिद्धीच्या दरम्यान त्यांनी एकमेकांच्या कामाचे कौतुक केले. या दोघांची भूमिका असलेल्या ‘द ग्रेट गॅट्सबाय’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने गत वर्षाच्या ‘कान चित्रपट महोत्सवा’चे उदघाटन झाले होते. अलिकडेच लिओनार्डोचा ‘द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ‘गोल्डन ग्लोब’चा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leonardo dicaprio wants to work with amitabh bachchan again
Show comments