मूळ नाव – प्रबोधचंद्र डे
जन्मदिनांक – १ मे १९१९, कोलकाता येथे
कौटुंबिक पार्श्वभूमी – काका कृष्णचंद्र डे हे प्रसिद्ध संगीतकार असल्याने घरात संगीताचे वातावरण, होते. साहजिकच मन्नादांवर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून त्यांनी गाण्याची मुळाक्षरे गिरवली. पुढे स्कॅाटिश चर्च कॅालेजमध्ये शिकताना सलग तीन वर्ष संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संगीतात कारकीर्द करण्यासाठी १९४२ मध्ये के. सी. डे यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.
कारकिर्द – मुंबईत के. सी. डे खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास व सचिनदेव बर्मन यांच्याकडे संगीत सहाय्यक या नात्याने त्यांनी उमेदवारी केली. याच काळात हिंदी चित्रपटसंगीताला त्यांना जवळून अभ्यासता आले. एकीकडे सहाय्यक संगीतकाराची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आपली मूळ आवड म्हणजे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही सुरूच ठेवले होते. मुंबईत उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेतले.
१९४३ मध्ये रामराज्य या चित्रपटासाठी शंकरराव व्यास यांच्या संगीत दिर्ग्दशनात हिंदी चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र उपर गगन विशाल (मशाल) या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभली. संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या गायकीचा चांगला वापर करुन घेतला. हिंदीसह मराठी, गुजराथी, बंगाली, मल्याळम, कन्नड, आसामी आदी अनेक भाषांतून सुमारे साडेतीन हजार गाण्यांचे पार्श्वगायन त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा