Vicky Kaushal and Katrina Kaif Life Threats: अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती तसेच अभिनेता विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये मुंबईमधील सांताक्रूझ पोलीस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आम्ही सांताक्रूझ पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नक्की वाचा >> गुगलच्या सह-संस्थापकाच्या पत्नीसोबतच्या कथित प्रेमप्रकरणावर इलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “काल रात्रीच आम्ही…”

कतरिना आणि विकी हे नुकतेच मालदीवला सुट्ट्यांसाठी गेले होते. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त जवळच्या मित्रपरिवारासोबत हे दोघे मालदीवला गेलेले. त्यांनी या दौऱ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते. कतरिना आणि विकीला नेमकी काय धमकी देण्यात आली आहे यासंदर्भातील माहिती सध्या उपलब्ध नसली तरी या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करुन घेण्यात आल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल

नक्की पाहा >> कतरिनाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, मालदिवमध्ये मजा-मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

काही आठवड्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणे तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी सलमान आणि त्याच्या वडिलांना एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आली होती. यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय. तपासानुसार बिश्नोई टोळीकडू बॉलिवूड कलाकारांकडून खंडीणी गोळा करण्याच्या उद्देशाने या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: बिष्णोई गँगकडून सलमानला काळवीट शिकारीवरुन धमकी; पण बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?

शुक्रवारीच सलामनने नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची त्यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात जाऊन भेट घेतली. सलमानने शस्त्र बाळण्यासंदर्भातील परवाना देण्याची विनंती पोलीस खात्याकडे केल्याचे समजते.