पुरी जगन्नाथ यांचं दिगदर्शन असलेला आणि विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच सोशल मीडियावरही या चित्रपटावर बरेच मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. विशेषतः अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. तिच्या अभिनयावरून तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे. या चित्रपटामध्ये अनन्याचा असा एक संवाद आहे ज्यामुळे आता तिला ट्रोल केलं जात आहे.

अनन्या आणि विजय देवरकोंडा यांच्या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सीनचा व्हिडी खूप व्हायरल होताना दिसत असून यात अनन्या अभिनयाच्या करिअरसाठी हॉलिवूडला जाणार असल्याचं बोलताना दिसत आहे. अनन्या म्हणते, “मी एक स्टार आहे आणि माझं करिअर पुढे नेण्यासाठी मी हॉलिवूडला जात आहे.” तिच्या याच संवादाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
आणखी वाचा- शाहरुखला लग्नासाठी दुसरी कोणी भेटल्यास काय करशील? गौरी खानने दिलं होतं ‘असं’ उत्तर

Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

अनन्याच्या या सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावरून नेटकरी अनन्याला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने तिचा हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “खरंच की काय? आधी बॉलिवूड करिअर तरी सांभाळ, नीट अभिनय तरी कर ताई.” याशिवाय अन्य एका युजरने लिहिलं, “मला अद्याप हसू आवरत नाहीये. आता आम्हाला, स्कार्लेट जॉहनसन, ऐमा वॉटसन यांच्याशी अनन्याची तुलना करावी लागणार का?” तर आणखी एकाने लिहिलं, “मला कळत नाही लेखकाने अशाप्रकारचा संवाद हिच्यासाठी लिहिलाच कसा?”
आणखी वाचा-विजय देवरकोंडाची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘लायगर’ला थंड प्रतिसाद

दरम्यान ‘लायगर’मध्ये अनन्या पांडे एका सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सरच्या भूमिकेत आहे. तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि विजय देवरकोंडा एक बॉक्सर असून तो तिच्या प्रेमात पडतो. या दोघांमध्ये एक सीन आहे. या सीनमध्ये दोघंही भर रस्त्यात एकमेकांशी भांडताना दिसत आहे. याच भांडणात अनन्या विजयला म्हणते, “मी एक स्टार आहे आणि मला माझ्या अभिनयाच्या करिअरसाठी हॉलिवूडला जायचं आहे.” आता याच संवादामुळे अनन्या ट्रोल होत आहे.

Story img Loader