विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट ‘लायगर’ २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची खूप चर्चा झाली आणि कलाकारांनीही जोरदार प्रमोशन केले. पण रिलीज झाल्यानंतर ‘लायगर’ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या अपयशानंतर एकीकडे अभिनेता विजय देवरकोंडाने मानधन परत करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे चित्रपटाच्या खराब प्रदर्शनानंतर सहनिर्माती चार्मी कौरने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे.

‘लिगर’ची सह-निर्माती चार्मी कौर यांनी ट्विटरवर सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली. चार्मी कौरने लिहिलं, ‘चिल मित्रांनो! सोशल मीडियातून फक्त ब्रेक घेत आहे. पुरी जगन्नाथ दमदार प्रदर्शनासह परत येतील…तोपर्यंत जगा आणि जगू द्या.’ चार्मी कौरच्या या ट्वीटवर अनेक युजर कमेंट करत आहेत आणि तिला मोठ्या दमदार कमबॅक करण्यास सांगत आहेत.
आणखी वाचा- “तुम्ही लोकांची फसवणूक केली…” विवेक अग्निहोत्रींची आमिर खानवर जोरदार टीका

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मला ‘लाइगर’बद्दल खूप आत्मविश्वास होता असं चार्मी कौर म्हणाली होती. ती म्हणाली, “२०१९ मध्ये मी बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरला भेटले आणि २०२० मध्ये पहिल्या शेड्यूलचे शूटिंग सुरू झाले. ‘आरआरआर’ आणि ‘पुष्पा’ नंतर आम्हाला चित्रपट फ्लोरवर आणायचा होता, पण तसे झाले नाही. चित्रपट चांगला होईल अशी आम्हाला अपेक्षा होती.

आणखी वाचा- आमिर खान आणि विजय देवरकोंडाच्या कृतीने वेधून घेतले सर्वांचे लक्ष, आलिया भट्टचे ‘ते’ वक्तव्य ठरले तंतोतंत खरे

‘लायगर’बद्दल बोलायचे झाले तर समीक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. हा चित्रपट एका स्ट्रीट फायटरच्या जीवनावर आधारित आहे, जो एमएमए फायटर होण्यासाठी मेहनत घेतो. विजय देवरकोंडा स्ट्रीट फायटरच्या भूमिकेत आहे, तर अनन्या पांडे त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे. तसेच रम्या कृष्णाने विजयच्या आईची भूमिका साकारली आहे. याशिवाय माईक टायसनही चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. मात्र या चित्रपटाच्या कथेत प्रेक्षकांना नविन्य न दिसल्याने तो फ्लॉप झाला.

Story img Loader