दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. याच चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण हा चित्रपट यशस्वी ठरू शकला नाही आणि चित्रपटावर बरीच टीकाही झाली. त्यानंतर आता या चित्रपटाच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी काळ्या पैशाच्या वापर करण्यात आल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही रिपोर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार ‘लायगर’च्या निर्मितीसाठी आलेल्या पैशाचा सोर्स काय होता हे जाणून घेण्यासाठी आयकर विभागच्या अधिकाऱ्यांनी १७ नोव्हेंबरला दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्मिती चार्मी कौर यांची तब्बल १५ तास चौकशी केली. मात्र, अद्याप या वृत्ताची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

रिपोटर्समधून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मितीसाठी परदेशातून पैसे आणण्यात आले होते. १९९९ च्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट कायद्यानुसार (FEMA), चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी परदेशी स्रोत वापरणे हा गुन्हा मानला जातो. यामुळेच ईडीने गुंतवणूकदारांच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर यांना समन्स बजावले होते.

मीडिया हाऊसला मिळालेल्या माहितीनुसार, “ईडी अधिकाऱ्यांना चित्रपटासाठी पैसे देणाऱ्या कंपनीचे किंवा व्यक्तींचे नाव जाणून घ्यायचे होते. चित्रपटासाठी वापरण्यात आलेला पैसा परदेशातून आल्याचे त्यांचे मत आहे. या चित्रपटासाठी मिळालेल्या निधीत फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट कायद्याचे काही उल्लंघन झाले आहे का? याचा तपास करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.” एवढेच नाही तर राजकीय नेत्यांनी आपल्या काळ्या पैशाचा वापर या चित्रपटाला निधी देण्याचा प्रयत्न केला आहे असंही बोललं जातंय.