भारताकडून ज्या खेळाला फारसं महत्व दिलं गेलं नाही त्या खेळाच्या अवती भवती एखादी कथा लिहिणं आणि १२५ कोटी खर्च करून त्यावर चित्रपट बनवणं ही तशी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवीन गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) सारख्या खेळात प्रथमच एका भारतीय व्यक्तीने सहभाग घेणं आणि तिथे आपली छाप पाडणं ही कथा तशी ऐकायला वेगळी वाटते खरी…. पण ‘लाइगर’ या चित्रपटात मात्र तिची योग्य मांडणी न केल्याने त्याच्याशी सामान्य प्रेक्षक जोडला जाणं कठीण आहे. ‘लाइगर’ म्हणजेच लायन आणि टायगरचं मिश्रण करून जबरदस्ती तयार केलेलं हे समीकरण बेचव आणि फिकट मिसळीसारखं वाटतं.

बघायला गेलं तर चित्रपटाची कथा तशी चांगली आणि हटके आहे. केवळ या चित्रपटाला नको तेवढं मोठं करुन, मोठ्या स्केलवर प्रदर्शित करण्याच्या नादात कथेतला आत्मा हरवल्यासारखा वाटतो. मुंबईत आपल्या आईबरोबर चहाची टपरी चालवणारा एक तरुण मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतो आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये निपुण होतो, त्यामागे त्याच्या आईची काय भूमिका आहे? हे सगळं अधोरेखित करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. पण जेव्हा कथेमधला रोमान्स या मूळ कथानकावर भारी पडतो, तेव्हा मात्र हा चित्रपट अगदी नकोसा वाटायला लागतो.

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

आणखी वाचा : बहुचर्चित ‘लाइगर’ चित्रपटाबद्दल अभिनेता, समीक्षक केआरकेने केली वेगळीच भविष्यवाणी!

चित्रपटाचं बजेट चांगलं असल्याने छायाचित्रण, पार्श्वसंगीत हे उत्तमच आहे. शिवाय चित्रपटातले अॅक्शन सीन्स फार उत्तमरित्या रंगवले आहेत. या गोष्टी सोडल्या तर चित्रपटातल्या प्रेमकाहाणीमुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. बिर्याणी किंवा मसाले भात खाताना मध्येच दाताखाली लवंग आल्यावर आपल्याला जे वाटतं अगदी तसंच आपल्याला या चित्रपटात जबरदस्ती पेरलेली प्रेमकहाणी बघताना वाटतं.

बाकी चित्रपटातल्या इतर गोष्टीदेखील यथातथाच आहेत. चित्रपटातला एकही संवाद लक्षात ठेवण्यासारखा नाही. गाणी तर सगळीच विसरून जावीत इतकी भयानक आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध हा बऱ्यापैकी विषयाला धरून वाटतो. पण उत्तरार्ध हा पूर्णपणे फिस्कटलेला आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर विजय देवरकोंडा याचाच अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे, लाइगरचं ते अडखळत बोलणं, त्याचा थोडासा भोळसट स्वभाव हे विजयने अगदी अचूक पकडलं आहे. रम्या कृष्णनसारखी दिग्गज अभिनेत्री मात्र यात पूर्णपणे लाऊड वाटते. रॉनित रॉय प्रशिक्षकाच्या भूमिकेत शोभून दिसला आहे, पण त्याच्या अभिनयात यात वाव अजिबात नाही. मकरंद देशपांडे यांची छोटीशी भूमिका चांगली जमून आली आहे. बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटात दिसणारा अभिनेता अली याचं पात्र थोडं विनोदी आहे, पण तेही अगदीच काही सीन्सपुरतं.

बाकी पिता-पुत्री म्हणजेच अनन्या पांडे आणि तिचे वडील चंकी पांडे यांनी या चित्रपटात जितका वाईट होऊ शकेल, तितका वाईट अभिनय केला आहे. अनन्या पांडेने आता वेळीच अभिनयाची वाट सोडून नोरा फतेहीसारखी कामं शोधायला हवीत असं माझं प्रांजळ मत आहे. रुप, रंग आणि उत्तम फिगर सोडून अभिनयाच्या बाबतीत अजूनही अनन्या कुठेच योग्य नाही ही बाब प्रकर्षणाने अधोरिखेत होते.

आणखी वाचा : विजय देवरकोंडाला आहे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींवर क्रश, खुलासा करत म्हणाला…

सुप्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर माईक टायसन हा छोट्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतो. पण माईक टायसन आणि विजय देवरकोंडा यांच्यातला शेवटचा तो सीन निव्वळ हास्यास्पद आहे. मध्यंतरी अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या ‘कंबख्त इष्क’मध्येदेखील अशीच एक सीलवेस्टर स्टेलॉनची छोटीशी भूमिका होती. एकंदरच बॉलिवूडकरांचं हॉलिवूडप्रेम यातही आपल्याला पाहायला मिळतं. मार्टिन स्कॉर्सेसेचा ‘रेजिंग बुल’ सीलवेस्टर स्टेलॉनचा ‘रॉकी’ किंवा नुकताच आलेला आमिरचा ‘दंगल’ या यादीत ‘लाइगर’चं नाव अगदी सहज घेता आलं असतं. पण एकूणच मूळ कथानकापासून भरकटल्यामुळे, अत्यंत रटाळ पटकथेमुळे, नकोशा वाटणाऱ्या प्रेमकहाणीमुळे आणि कलाकारांच्या काही वक्तव्यामुळे ‘लाइगर’चं भवितव्य तसं अंधकारमय वाटतंय.

Story img Loader