अभिनेत्री अर्चना पुरण सिंग कपिल शर्माच्या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसून येते. मात्र अभिनयाच्या क्षेत्रात ती अनेक वर्ष कार्यरत आहे. आजवर तिने विनोदी, खलनायक, अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘राजा हिंदुस्थानी’, ‘मोहब्बतें’, ‘कुछ कुछ होता है’, हे तिचे गाजलेले चित्रपट. मोठ्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर तिने काही काळ छोट्या पडद्यावर आपला ठसा उमटवला आहे. ‘श्रीमान श्रीमती’, ‘जाने भी दो पारो’, ‘जुनून’ यांसारख्या कार्यक्रमत ती आपल्याला दिसली आहे. यापूर्वी ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात होती, परंतु ‘कॉमेडी सर्कसने’ अर्चना पूरण सिंगला घराघरात पोहोचवले. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाच्या सिजन्समध्ये ती आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर २०१९ पासून ती ‘कपिल शर्माच्या’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आजही दिसत आहे.

इंडियाज लाफर चॅम्पियनची जाहिरात करताना, अर्चना इंडियन एक्सप्रेस डॉटकॉमशी तिने संवाद साधला आहे. जिथे तिने भूमिकांच्या कमतरतेबद्दल चर्चा केली आहे. ती असं म्हणाली ‘हॉलीवूडमध्ये, एखाद्या भागामध्ये स्टिरियोटाइप होणे हे एक सकारात्मक लक्षण आहे. “ते म्हणतात की जर तुम्हाला सारख्याच भूमिका मिळत राहिल्या तर याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान आहात की लोक तुमच्याकडे पाहत राहायचे आहेत. मला वाटते की हा एका अभिनेत्याचा मृत्यू आहे. मला आठवते की नीना गुप्ता यांनी एकदा सोशल मीडियावर काम मागण्यासाठी पोस्ट केली होती, मला वाटते की मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून काम मागण्यासाठी ही संधी घेईन’.

नव्व्दच्या दशकात ‘सलमानचा आवाज’ म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम यांना ओळखले जात होते

ती पुढे म्हणाली की, ‘एखादी भूमिका छाप पडून जाते, बर्‍याच लोकांना असे वाटते की सुश्री ब्रिगेन्झा नंतर त्यांनी मला काय ऑफर करावे. ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित होऊन जवळपास २५ वर्षे झाली आहेत. असं जरी असलं तर अद्याप ते पात्र अजूनही माझ्या मागे आहे. लोकांना असेही वाटते की मी फक्त विनोदासाठीच योग्य आहे. एक अभिनेत्री म्हणून मला वंचित, फसवणूक झाल्याचे जाणवते आणि मला चांगल्या भूमिकांसाठी तळमळ राहिली आहे.’

अभिनेत्री अर्चना पुरण सिंग मूळची डेहराडूनची आहे. नव्वदच्या दशकात तिने आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती. सुरवातीला ‘अग्निपथ’, ‘शोला’ और शबनम’ ‘आशिक आवरासारख्या’ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने टीव्हीवरील ‘वाह क्या सिन है’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते. तिने अभिनेता परमित सेठीशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.

Story img Loader