देशभरात पसरलेल्या करोना विषाणूने फिल्म इंडस्ट्रीचं देखील कोट्यावधीचं नुकसान केलंय. गेल्या वर्षीपासून कित्येक फिल्म्स या थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आल्या आहेत. अखेर अनेक मेकर्सनी परिस्थितीपुढे हात टेकवत आपआपल्या फिल्म्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केल्या. नुकतंच बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने त्याची ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केली. त्यानंतर आता अभिनेता अजय देवगणची ‘मैदान’ ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.
ज्याप्रमाणे सलमान खानने त्याची ‘राधे’ फिल्म पे पर व्ह्यूव्हच्या आधारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केली होती, त्याप्रमाणे अभिनेता अजय देवगणची ‘मैदान’ सुद्धा पे पर व्ह्यूव्हच्या आधारे रिलीज करण्याबाबत चर्चा सुरू होत्या. परंतू आता या फिल्मच्या निर्मात्यांनी समोर येत याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
अभिनेता अजय देवगणची ‘मैदान’ ही फिल्म एक स्पोर्ट्स बायोपिक आहे. या फिल्मची निर्मीती बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणाभ जॉय सेनगुप्ता यांनी केली आहे. नुकतंच मेकर्सनी याबाबत एक स्पष्टीकरण दिलंय. यात त्यांनी सांगितलं, “मैदान फिल्मला स्ट्रिमींग करण्याबाबत अजुन तरी कोणत्याही डिजीटल प्लॅटफॉर्मसोबत बोलणी सुरू नाही. सध्या आमचं लक्ष सर्व करोना नियमांचं पालन करत या फिल्मची शूटिंग पूर्ण करण्यावर लागलं आहे.”
यावर्षीच्या सुरवातीला जेव्हा करोनाचं थैमान शमलं होतं, त्यावेळी अनेक थिएटर्स खुले करण्यात आले होते. याचवेळी अनेक मेकर्सनी काही फिल्म्स थिएटर्समध्ये रिलीज करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता इतर मेकर्स देखील आपआपल्या फिल्म्सना पे पर व्ह्यूव्हच्या आधारे स्ट्रिमींग करण्यावर विचार करताना दिसून येत आहेत.
अमित आर शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ ही फिल्म फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांच्यावरील बायोपिक आहे. अभिनेता अजय देवगणची ही पहिली स्पोर्ट्स फिल्म आहे. ‘मैदान’ ची कथा १९५२-६२ दरम्यान भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण क्षणांना रंगवण्यात आलं आहे. या फिल्मच्या सहनिर्मात्यांमध्ये झी स्टुडिओचा देखील समावेश आहे. त्यांनी अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’सोबत देखील सहनिर्मीती केली होती. म्हणूनच ‘राधे’ फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर पे पर व्ह्यूव्ह आधारे रिलीज केली, तर ‘मैदान’ फिल्म देखील पे पर व्ह्यूव्हच्या आधारे रिलीज करण्यात येईल, अशा चर्चा सुरू होत्या.