वादग्रस्त हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहानने ‘लिंडसे’ या तिच्या रियालिटी शोच्या चित्रकरणादरम्यान तिचा गर्भपात झल्याची माहिती उघड केली. लिंडसे लोहानने तिच्या रियालिटीशोच्या अंतिम भागात याबाबतचा खुलासा केला. सदर कारणामुळेच ऑपरा विन्फ्रे ‘ओडब्ल्यूएन नेटवर्क’च्या या कार्यक्रमाच्या चित्रीकरणापासून दोन आठवड्यांची सुटी घेतल्याचे तिने म्हटले असल्याचे ‘टीएमझी ऑनलाईन’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. याविषयी बोलताना लिंडसे म्हणाली, मी जी दोन आठवड्यांची सुटी घेतली होती त्याकाळात माझा गर्भपात झाला असल्याचे कोणाला माहिती नव्हते. शोपासून काही दिवस दूर राहिल्याचा खुलासा करताना शोच्यादरम्यान लिंडसेने या घटनेची माहिती दिली. पित्याचा खुलासा करण्याबाबत आणि ती किती दिवसाची गर्भवती होती, याची माहिती पुरविण्यास लिंडसेने नकार दिला.
‘रियालिटी शो’च्या चित्रीकरणादरम्यान लिंडसे लोहानचा गर्भपात
वादग्रस्त हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहानने 'लिंडसे' या तिच्या रियालिटी शोच्या चित्रकरणादरम्यान तिचा गर्भपात झल्याची माहिती उघड केली. लिंडसे लोहानने तिच्या रियालिटीशोच्या अंतिम भागात...
First published on: 21-04-2014 at 07:48 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi CinemaहॉलीवूडHollywood
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lindsay lohan suffered miscarriage while filming reality show