सेन्सॉर बोर्डासोबत चाललेल्या प्रदीर्घ वादानंतर दिग्दर्शक- निर्माता प्रकाश झा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनलेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सिनेमाच्या कथेमुळे हा सिनेमा अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या नव्या पोस्टरमध्ये हाताच्या मधल्या बोटाऐवजी लिपस्टिक दाखवण्यात आली आहे. या पोस्टरमुळे हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येईल यात काही शंका नाही. हा सिनेमा आधी पुढच्या महिन्यात २८ तारखेला प्रदर्शित होणार होता पण आता हा सिनेमा २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

हार्दिक पांड्या, भावा जिंकलस!

आतापर्यंत अनेक चित्रपट महोत्सवातून जगभरात दाखवण्यात आला आहे. पण आता हा सिनेमा अखेरीस भारतात प्रदर्शित होणार यावरून सिनेमाची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव हल्ली जास्तच खूश आहे. या सिनेमाला आतापर्यंत अनेक देशांत १० आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सेन्सॉर बोर्डसोबत साधारण सहा महिने झालेल्या संघर्षानंतर आता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘ज्यांच्या जीवनावर मी हा सिनेमा तयार केलाय त्या महिलांचा हा विजय आहे. आता सिनेमाच्या प्रदर्शनानंतर यावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांची मला अधिक उत्सुकता आहे. हा सिनेमा २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे. तसेच या संपूर्ण लढाईत प्रकाश झासह संपूर्ण सिनेसृष्टीचे सहकार्य मिळाले. आमचा सिनेमा आता एकता कपूरच्या ऑल्ट एण्टरटेनमेन्ट आणि बालाजी मोशन पिक्चरद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे,’ असे अलंकृताने एका मुलाखतीत म्हटले.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अलंकृता पुन्हा एकदा स्त्री-प्रधान सिनेमे तयार करताना दिसेल. सध्या तिच्या हातात दोन कथा आहेत ज्यावर ती काम करणार आहे. या दोन्ही कथा महिला प्रधान आहेत. सेन्सॉर बोर्डाने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा प्रदर्शित करायला मनाई केली होती.

आमिर, आलिया, धनुष, ज्युनिअर एनटीआरला संकरभारनम पुरस्कार जाहीर

सेन्सॉरच्या या निर्णयावर आक्षेप व्यक्त करत अलंकृताने एफसीएटीकडे अपील केले होते. सिनेमात वापरण्यात आलेली असभ्य भाषा आणि काही दृश्य हा त्या सिनेमाचा एक अविभाज्य भाग आहे. सिनेमात देहविक्री करणाऱ्यांसाठी ज्या शब्दांचा वापर करण्यात आला त्या शब्दांना म्यूट करण्याचे आदेश ट्राब्यूनलने देत, सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आलं होतं.

हा सिनेमा चार महिलांच्या आयुष्याभोवती फिरतो. नित्यनेमांची कामं करून, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक- शाह, अहाना कुमरा आणि प्लाबिता बोरठाकूर यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहे.

Story img Loader