नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन मालिका शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लास वेगास येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मिडियावरून याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.

दोन दिवस उलटून गेले तरी मॅथ्यूचे चाहत्यांचा या बातमीवर विश्वास बसणं कठीण झालं. मनोरंजन क्षेत्रातील व त्याच्या जवळच्या मित्रांनी कलाकारांनी त्यांचं दुःख सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. खासकरून ‘फ्रेंड्स’ या सीरिजमध्ये एकत्र काम करणाऱ्या मॅथ्यू यांच्या सहकलाकारांनाही याचा मोठा धक्का बसला आहे.

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Surekha Kudachi
“लग्न फार उशिरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

आणखी वाचा : Tejas Box office collection: ५०% शोज रद्द, शून्य तिकीट विक्री; कंगनाचा चित्रपट ठरतोय जबरदस्त फ्लॉप

अशातच आता मॅथ्यू यांच्या निधनानंतर लिसा कुड्रो ही मॅथ्यू यांच्या पाळीव कुत्र्याला दत्तक घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘फ्रेंड्स’ या मालिकेत लिसा फीबीची भूमिका करत होती. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार मॅथ्यूच्या निधनानंतर त्यांच्या कुत्र्याकडे लिसाच पाहणार आहे. अद्याप ‘फ्रेंड्स’मधील कलाकारांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही कारण अजूनही सगळेच या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

‘फ्रेंड्स’ ही डेव्हिड क्रेन आणि मार्टा कॉफमन यांनी तयार केलेली अमेरिकन टीव्ही मालिका आहे. ही १९९४ मध्ये प्रसारित झाली होती आणि त्याचे १० सीझन होते. हा शो २००४ मध्ये बंद झाला, पण आजही ओटीटीच्या माध्यमातून लोक याचा आस्वाद घेतात. या ‘सीट-कॉम’ शोमध्ये जेनिफर अॅनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लँक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

Story img Loader