प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, भव्य दिव्य मंचावर सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार, प्रेक्षकांमधून मिळणारी प्रचंड दाद, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती, जीवनगौरव पुरस्कारावेळी भारावून गेलेल्या समस्त प्रेक्षकांनी दिेलेली मानवंदना अशा भारावून टाकणा-या वातावरणात झी चित्र गौरव २०१६ पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात मुंबईतील बांद्रा – कुर्ला संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या बहुमानासह इतर अनेक पुरस्कारांवर ‘कट्यार काळजात घुसली’ने आपली ठसठशीत मोहोर उमटवली तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नाना पाटेकर आणि दिग्दर्शनासाठी महेश मांजरेकर या पुरस्कारांसहित इतरही मानाचे पुरस्कार पटकावित ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ चित्रपटानेही या पुरस्कारांवर आपली छाप सोडली. अतिशय दिमाखदार पद्धतीने रंगलेला झी चित्रगौरवचा हा सोहळा येत्या २० मार्चला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रेक्षेपित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा